Muskan Khan,Zeeshan Siddique
Muskan Khan,Zeeshan Siddique sarkarnama
देश

'हिजाब'चे समर्थन करणाऱ्या विद्यार्थींनीला आमदारानं दिला आयफोन अन् घड्याळ

सरकारनामा ब्युरो

बेंगलुरू : कर्नाटक (Karnataka)मध्ये हिजाबचा (Hijab)वाद वाढत असताना काही विद्यार्थ्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या होत्या, त्याला उत्तर म्हणून 'अल्ला हो अकबर' (Allah-hu-Akbar)अशी घोषणा देणाऱ्या विद्यार्थींनींची एका आमदाराने भेट घेतली. तिला आयफोन, घड्याळ भेट देऊन तिला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

बांद्राचे आमदार जीशान सिद्धीकी (MLA Zeeshan Siddique)यांनी मुस्कान खान (Muskan Khan)हिची तिच्या घरी मांड्या येथे जाऊन भेट घेतली. तिचे कैातुक केले. मांड्या येथील कॉलेजमध्ये मुस्कानने हिजाब परिधान केला होता यावरुन वाद झाला. काही विद्यार्थ्यांनी तिला पाहून ''जय श्रीराम''च्या घोषणा दिल्या होत्या. यानंतर मुस्कानने 'अल्लाह हो अकबर'चा नारा दिला होता.

या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून मुस्कान ही चर्चेत आहे. या वादानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणार असल्याचे मुस्कानने कॉलेज प्रशासनाला सांगितले.

जीशान सिद्धीकी म्हणाले, ''मुस्कान खान हिने केलेले साहस कैातुकास्पद आहे. तिच्या केलेले कार्यामुळे मी आनंदीत झालो आहे. महिला शक्ती काय करु शकते हे मुस्कान हिनं दाखवून दिले ''हिजाब परिधान करणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या आवडीचे कपडे कोणीही परिधान करु शकतो. मुस्कानच्या परिवाराला भेटून मला आनंद झाला,''

कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब प्रकरणावरुन ( Karnataka Hijab Controversy)सध्या वाद सुरु आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आव्हान देण्यात आले होते. याबाबत सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्यास शुक्रवारी नकार दिला आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. सुप्रीम कोर्टाने हिजाब प्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी करण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे याचिकाकर्त्याला मोठा झटका बसला आहे.

''योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल,'' असे सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. कर्नाटकात काय होत आहे, यावर आमचं लक्ष आहे, हा राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा बनवू नका आणि योग्यवेळी त्यात हस्तक्षेप केला जाईल. हिजाबचा मुद्दा धार्मिक आणि राजकीय बनवू नका, असे सुप्रीम कोर्टनं म्हटलं आहे.हिजाब, बिकिनी, घुंघट, जीन्स यांचे कॉग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही समर्थन केले आहे. (karnataka hijab row mla zeeshan siddiqui gifts iphone to Muskan Khan)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT