भाजपला खिंडार ; चार नगरसेवकांनी पुन्हा बांधले शिवबंधन

शिवसेनेचे नेते, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
shivsena
shivsenasarkarnama

जळगाव : जळगाव महापालिकेवर गेल्या अडीच वर्ष भाजपची एकहाती सत्ता होती. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेनं भाजपला मोठा दणका दिला. जळगाव महापालिका (Jalgaon municipal corporation) महापौर निवडणुकीत भाजपचे 27 नगरसेवक (BJP Corporator) सेनेत खेचून आणले होते. जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला. भाजपला शिवसेनेनं पुन्हा एकदा खिंडार पाडले आहे.

शिवसेना भाजपला धक्का देण्यात पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. शिवसेनेनं भाजपला दणका देत चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे नेते, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे महापालिकेतील बहुमत कमी झाल्याने चिंता वाढली होती. आता शिवसेनेचे बहुमत वाढल्याने महापालिकेत निर्णय घेतांना शिवसेनेला त्याचा फायदा होणार आहे.

सभागृह नेते ललित कोल्हे यांनी ही खेळी केल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये गेलेल्या बंडखोर नगरसेवकांच्या संपर्कात अनेक दिवसापासून ललित कोल्हे होते. त्यांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश येत आहे. त्यांच्या प्रयत्नाने चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. शुक्रवारी पाळधी येथे या चार नगरसेवकांनी शिवबंधन बांधले. नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे अशी या नगरसेवकांची नावे आहेत.

shivsena
आम्ही कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही ; राजभवनात मुख्यमंत्र्यांचा टोला

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी, धुडकू सपकाळे, ऍड.दिलीप पोकळे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, हर्षल मावळे, मंगेश जोहरे, गोकुळ पाटील उपस्थित होते.

महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते.भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्यानं शिवसेनेचा भगवा फडकला.

shivsena
'पुढे चला मुंबई' ; अजितदादांनी केलं आदित्य ठाकरेचं कैातुक, एकाच गाडीने प्रवास

शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती. आता भाजपचे चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत गेले. त्यामुळे आपला नगरसेवक सध्या शिवसेनत आहे का भाजपमध्ये असा संभ्रम येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. जळगावमध्ये नगरसेवकांच्या भाजप-सेनेतून इकडून-तिकडे उड्या सुरुच आहे.

शिवसेनेचे नगरसेवक संख्या आता 40 झाली आहे. तर भाजपची 35 झाली आहे.या अगोदर भाजपच्या 28 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने भाजपची महापालिकेवर असलेली सत्ता संपुष्टात आली होती, शिवसेनेच्या जयश्री पाटील महापौर झाल्या तर भाजप फुटलेले कुलभूषण पाटील उपमहापौर झाले,आता 4 नगरसेवक फुटल्याने भाजपला पुन्हा दणका बसला आहे.

shivsena
लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण थांबवा : हृदयनाथ मंगेशकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com