Vijayendra, Ramesh Jigajinagi  Sarkarnaka
देश

BJP Politics : भाजपमध्ये दलितांना मोठा नेता होण्याची संधी नाहीच; खासदारानेच दिला घरचा आहेर

Sunil Balasaheb Dhumal

आनंद सुरवसे

Karnataka Political News : 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणून स्वत:ची पाठ थोपटणाऱ्या भाजपला त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने घरचा आहेर दिला आहे. 'तुम्ही दलित असाल तर भाजपमध्ये तुम्हाला मोठे होण्याची संधीच दिली जाणार नाही,' असा आरोप कर्नाटकातील भाजप खासदार रमेश जिगाजिनागी यांनी केला आहे. कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवरून जिगाजिनागी यांनी पक्षाविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. जिगाजिनागी हे विजयपुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. (Latest Political News)

दलित-सवर्ण वादाची ठिणगी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र यांची कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्या निवडीवरून कर्नाटक भाजपमध्ये दलित-सवर्ण वादाची ठिणगी पडली.

या प्रदेशाध्यक्ष निवडीवर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार जिगाजिनागी यांनी 'विजयेंद्र हे आता पक्षाचे नेते नाहीत, तर ते प्रदेशाध्यक्ष आहेत,' अशी उपरोधिक टीका केली. तसेच 'जर तुम्ही दलित असाल तर तुम्हाला भाजपमध्ये मोठे होण्याची संधी मिळणार नाही,' अशी सडेतोड प्रतिक्रिया देत खासदार जिगाजिनागी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

भाजपविरोधात नाराजी

जिगाजिनागी म्हणाले की, 'तुम्हाला पक्षात मोठे स्थान मिळवायचे असेल तर तुम्ही गडगंज श्रीमंत असायला हवे किंवा उच्च जातीतील असायला हवे, तरच जनता तुम्हाला पाठिंबा देते. मात्र, तुम्ही दलित असाल तर तुम्हाला कोणीच पाठिंबा देत नाही. हे दुर्दैवी असून आम्हाला याची जाणीव आहे', असेही मत जिगाजिनागी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

वरिष्ठ नेत्यांवरही टीकास्त्र

भाजपच्या हायकमांड यांनी विजयेंद्र यांची केवळ ते येडियुरप्पा यांचे सुपुत्र आहेत, म्हणून कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षात दलितांना सधी दिली जात नसल्याची टीकाही जिगाजिनागी यांनी केली. दरम्यान, आता या प्रकरणामुळे भाजपमधील दलित-सवर्ण वादाचा मुद्दा समोर आला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT