Karnataka BJP : भाजप कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी बी. एस. येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांची निवड

vijayendra bs yediyurappa : कर्नाटक भाजपमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून निर्माण झालेला तिढा सुटला आहे.
B S yedurappa
B S yedurappa Sarkarnama
Published on
Updated on

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र येडियुरप्पा यांची भाजपच्या कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षांवर घराणेशाहीच्या आरोप करणाऱ्या भाजपनेही विजयेंद्र यांच्या निवडीद्वारे घराणेशाहीचा कित्ता गिरवला आहे. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही पक्ष संघटनेवर आपली पकड असल्याचे बी. एस. येडियुरप्पा यांनी दाखवून दिले आहे.

B S yedurappa
Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात दिग्गज नेत्यांची हजेरी

प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीवरून गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटक भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. शेवटी १० नोव्हेंबर रोजी या वादावर पडदा पडला. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदावरून भाजपमध्ये गटबाजी सुरू झाली होती. निवडणुकीचा निकाल लागून जवळपास सहा महिने झाले आहेत. सहा महिन्यांनंतर प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात भाजपला यश आले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र असलेले विजय हे शिकारीपुरा मतदारसंघाचे आमदार आहेत. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी गेलेल्या महिनाभरापासून भाजपमध्ये खलबते सुरू होती. नावावर एकमत होत नसल्याने निवड लांबणीवर पडत होती.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विजयेंद्र येडियुरप्पा यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्रक भाजपने जारी केले आहे. हा निर्णय तातडीने लागू झाला आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षपदासह अन्य काही निवडींचा तिढाही कर्नाटक भाजपमध्ये होता. आता प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटला असून, विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड करायची, हा प्रश्न कायम आहे. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झालेल्या बी. एस. येडियुरप्पा यांची पक्ष संघटनेवर अद्यापही आपली पकड असल्याचे प्रदेशाध्यक्षपदी मुलाची निवड करून दाखवून दिले आहे. शोभा करंडलजे, सी. टी. रवी, व्ही. सुनील कुमार हे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. नलीन कुमार कतील यांच्याकडून विजयेंद्र येडियुरप्पा हे पदभार स्वीकारतील. विजयेंद्र हे भाजपचे दहावे प्रदेशाध्यक्ष असतील. या निवडीमुळे कर्नाटक भाजपने सुटकेचा श्वास घेतला असेल, कारण निवड लांबणीवर पडत असल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली होती. पाच ते सहा महिने पक्ष नेतृत्वाविना असल्यामुळे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा नाराज झाले होते. त्यातूनच त्यांनी बुधवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते.

लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाला 'एनडीए'मध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. या निर्णयावरूनही कर्नाटक भाजपमध्ये खदखद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. हा निर्णय घेताना राज्यातील नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे काही नेत्यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकंदर, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र नाही.

B S yedurappa
Vikhe vs Kolhe : भाजपच्या युवा नेत्याने विखेंविरोधात दंड थोपटले, शिर्डी मतदारसंघातून लढणार!! चर्चांना उधाण...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com