Karnataka Police Risk Allowance News : राज्यातील जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांचे जीवनमान अधिक चांगले व्हावे, यासाठी त्यांच्या जोखीम भत्त्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या धर्तीवर ५० टक्के वाढ करण्यात येईल, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली. राज्य पोलिसांसाठी आयोजित सर्वंकष क्षमता-वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचे शुक्रवारी बंगळूर येथील माणेक शॉ मैदानावर उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
पोलिसांच्या आर्थिक गरजांना सरकारकडून प्राधान्य दिले जाईल. गृह विभागाकडून पोलिसांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशिक्षणाचा जनतेच्या सुरक्षेसाठी वापर राज्य पोलिसांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) आभार मानताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांना शिक्षा करणे हाच धर्म आहे. तुम्ही सर्व जण अत्यंत निष्ठेने हे धर्मकार्य करत आहात. समाजात अशांतता निर्माण झाली किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडली की, नागरिकांच्या संरक्षणासाठी तुम्ही पुढे येता.’’
‘सीमेवर सैनिक, तर देशांतर्गत पोलिस’ ‘‘सीमेवर सैनिक आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलिस असतात. तुम्ही असल्यामुळे समाजात शांतता आणि सुरक्षितता टिकून राहते. काही जण पोलिसांच्या कामाबाबत टीका करतात; मात्र प्रत्यक्षात तुम्ही देशसेवा करत आहात आणि तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. देशाच्या सुरक्षेसाठीही ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग होत असल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.
बंगळुरात सक्षम पोलिस दल हवे बंगळूर हे जागतिक शहर असून, जगभरातील लोकांचे या शहराकडे लक्ष आहे. त्यामुळे पोलिस दल अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानसज्ज असणे आवश्यक असल्याचे शिवकुमार यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.