BJP Operation Lotus Sarkarnama
देश

BJP Operation Lotus: काँग्रेस आमदाराला फोन, भाजपाला हवे आहेत 50 आमदार विकत; पुन्हा 'ऑपरेशन लोटस', सरकार पाडण्यासाठी 100 कोटींची ऑफर

Ravikumar Gowda Claims BJP Offered 100 Crores: भाजपाला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत, त्यासाठी मला फोन आला होता, पण मी नकार दिला. मला ज्यांनी फोन केला होता त्याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे, योग्य वेळी ती आम्ही बाहेर काढू

Mangesh Mahale

Congress News :कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या एका आमदाराने विरोध पक्ष भाजपावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. 'कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती,' असा दावा काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे कर्नाटकमध्ये पुन्हा 'ऑपरेशन लोटस'ची चर्चा रंगली आहे.

"दोन दिवसापूर्वी मला फोन करून 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. भाजपाला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत, त्यासाठी मला फोन आला होता, पण मी नकार दिला. मला ज्यांनी फोन केला होता त्याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे, योग्य वेळी ती आम्ही बाहेर काढू," असा इशारा रविकुमार गौडा यांना विरोधकांना दिला आहे.

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रविकुमार गौडा हे यांनी हे मांड्या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आहेत. "भाजप आमदारांना आमिष दाखवून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असली तरी कोणताही आमदार त्यांच्या गळाला लागणार नाही. राज्यात काँग्रेसचं सरकार स्थिर असेल," असा विश्वास गौडा यांनी व्यक्त केला आहे.

गौडा यांनी असाच दावा मागील वर्षीय ऑक्टोबरमध्येही केला होता.एका पथकाने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्रीपदाचे आमिष दाखवले आहे. चार आमदारांसोबत संपर्क साधला होता आणि त्याचे आमच्याकडे पुरावेदेखील आहेत.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी एल संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, प्रल्हाद जोशी आणि एच डी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) यांच्यावर काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप गौडा यांनी केला होता.

गौडा म्हणाले,"136 आमदारांसोबत काँग्रेस सरकार मजबूत आहे. गरीबांचे समर्थक असलेल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना कुणीही हटवू शकत नाही, पण अशी ऑफर देणाऱ्या व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वचन दिले आहे. त्यासाठी ते सरकार पाडण्यासाठी राज्यात फिरत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT