Karnataka teachers policy Sarkarnama
देश

maternity leave policy : महिला शिक्षकांसाठी गुड न्यूज! प्रसूती रजेनंतर आता पसंतीच्या शाळेत बदली

Karnataka teacher transfer policy : नवजात बालकाच्या संगोपनासाठी सुरुवातीची पाच वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात आईला मुलासोबत अधिक वेळ घालवणे आवश्यक असते. यासाठीच कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षणल विभागाने राज्यभरातील महिला शिक्षिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Aslam Shanedivan

  1. महिला शिक्षकांना प्रसूती रजेनंतर पसंतीच्या शाळेत 5 वर्षे सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे.

  2. शिक्षण मंत्री मधु बांगारप्पा यांनी या निर्णयाची घोषणा केली.

  3. या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Belgaum News : राज्यातील महिला शिक्षकांसाठी महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय दिला. प्रसूती रजेनंतर सेवेत परतणाऱ्या शिक्षिकांना त्यांच्या पसंतीच्या शाळेत पाच वर्षे सेवा बजावण्याची मुभा देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री मधु बांगारप्पा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे हा निर्णय राज्यभरातील सर्व शिक्षिकांसाठी महत्वाचा ठरणार आहे. शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यानी या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे.

नवजात बालकाच्या संगोपनासाठी सुरुवातीची पाच वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात आईला मुलासोबत अधिक वेळ घालवणे आवश्यक असते. महिला कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाचा समतोल राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे आहे. या नव्या निर्णयानुसार प्रसूती रजेनंतर पुन्हा शिक्षण विभागात सेवेत रूजू होताना संबंधित शिक्षिकाना त्यांच्या सोयीची शाळा निवडता येणार आहे.

त्या शाळेत बदली करून घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे. अर्थात पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठीच महिला शिक्षिकांना ही सुविधा मिळणार आहे. म्हणजे मुलाचे वय पाच वर्षांचे होईपर्यंत त्याना हव्या त्या शाळेत सेवा बजावता येणार आहे. त्यानंतर मात्र नियमानुसार बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. कौन्सिलिंग प्रक्रियेतून जी शाळा त्यांना मिळेल त्या शाळेत त्यांना रूजू व्हावे लागणार आहे.

या पाच वर्षाच्या काळात त्याना मुलांच्या संगोपनासाठी पुरेसा वेळ देता येणार आहे. सोयीची शाळा मिळाल्याने त्याना शाळेत जाण्यासाठी व शाळेतून घरी परतण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. या निर्णयाच्या माध्यमातून काम आणि व्यक्तीगत आयुष्यात समतोल साधण्याचा प्रयत्न शासनाकडून केला आहे.

सामाजिक दृष्टीनेही महत्वाचा निर्णय

हा निर्णय ग्रामीण किंवा दुर्गम भागात नियुक्त असलेल्या महिला शिक्षकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. इच्छित ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्याने प्रवासाचा ताण कमी होईल आणि मुलांच्या संगोपनात अधिक लक्ष देता येईल. या निर्णयाचे सामाजिक परीणामही होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, अशा धोरणामुळे महिला कर्मचाऱ्यांचा कामातील सहभाग आणि समाधान वाढणार आहे.

बालकांच्या आरोग्यदायी विकासाला चालना मिळणार आहे, शिवाय सरकारी सेवेत महिलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी आणि कोणत्या निकषांवर होणार, याबाबत शिक्षण विभागाकडून लवकरच सविस्तर परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे. हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही, तर सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.

FAQs :

1. हा निर्णय कोणासाठी आहे?
महिला शिक्षकांसाठी हा निर्णय लागू आहे.

2. शिक्षिकांना कोणती सुविधा मिळणार आहे?
प्रसूतीनंतर पसंतीच्या शाळेत 5 वर्षे सेवा देण्याची मुभा मिळणार आहे.

3. हा निर्णय कोणी जाहीर केला?
शिक्षण मंत्री मधु बांगारप्पा यांनी जाहीर केला.

4. या निर्णयाचा फायदा काय आहे?
शिक्षिकांना काम आणि कुटुंब सांभाळणे सोपे होईल.

5. हा नियम कधीपासून लागू होणार आहे?
सरकारच्या अंमलबजावणीनुसार लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT