

3 Language Formula: शालेय शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (2026 ते 2027) त्रिभाषिक सूत्र लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षण अभ्यासक्रम 2023 च्या शिफारशीनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीबीएसई बोर्डासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या त्रिभाषिक सुत्रात सर्वात मोठा निर्णय इंग्रजी भाषेबाबत घेण्यात आला आहे. इयत्ता 6वीपासून हे त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येणार आहे. यापूढे इंग्रजी ही भाषा अनिवार्य मानली जाणार नाही. ती निवडक भाषांपैकी एक असेल, असे या त्रिभाषा सुत्रांमध्ये म्हटले आहे.
त्रिभाषा सुत्रातील 3 भाषांपैकी 2 भाषा भारतीय असणार आहेत तर, इंग्रजी भाषेचा समावेश हा परदेशी भाषांच्या गटात करण्यात आला आहे. इंग्रजी ही निवडण भाषापैकी एक भाषा असेल. विद्यार्थ्यांना फ्रेंच, इंग्रजी, जर्मन यासारख्या परकीय भाषांमधून एक भाषा निवडावी लागणार आहे.
दहावीपर्यंत तीन भाषा अनिवार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान वाढण्यास मदत होणार आहे. संघ लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा संघ (MPSC) यांसारख्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना त्यांना त्यांचा फायदा होणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार, आता विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे सक्ती आहे. या त्रिभाषा सुत्रांमुळे विद्यार्थ्यांना त्या त्या भाषांच्या संस्कृतीसह सामाजिक, सांस्कृतिक जीवनाशी परिचय होणार आहे. नऊ प्रादेशिक भाषांसाठी नवीन पाठ्यपुस्तक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निवडलेल्या संबधित विषय चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होणार आहे.
इंग्रजीचे सक्ती रद्द केल्याने या भाषेचे विद्यार्थ्यांवरील दडपण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे इतर भाषांचा अभ्यास करण्यास त्यांना अधिकचा वेळ देता येणार आहे. परदेशी भाषांचा पर्याय खुला असल्याने त्यांना उच्च शिक्षण किंवा नोकरी-व्यावसायासाठी मोठी मदत होणार आहे.
तिसरी भाषा ही इयत्ता 6वी पासून ते 8वी पर्यंत अशा मधल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे.
या तिसऱ्या भाषेला पहिल्या आणि दुसऱ्या भाषेपेक्षा अधिक वेळ दिला जाईल.
विद्यार्थ्यांना मधल्या टप्प्यात अनोळखी भाषा शिकण्यासाठी अधिक वेळ आणि सराव आवश्यक असतो.
यामुळे दहावीपर्यंत तिसरी भाषा अनिवार्य करता येऊ शकते.
9 वी ते 10मध्ये या तिन्ही भाषा शिकवल्या जाव्यात अशी शिफारसही शालेय शिक्षण अभ्यासक्रम समितीने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.