BJP setback Kerala : देशातील पाच राज्यांतील निवडणूक निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून पश्चिम बंगाल व आसाम या दोन राज्यांत भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. तर पुदुच्चेरीमध्येही एनडीएने सत्ता शाबूत ठेवली आहे. दुसरीकडे केरळमध्ये भाजपने खाते उघडले असून तीन पहिल्यांदाच तीन उमेदवार निवडून आले आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
केरळमध्ये भाजपला २०२१ मध्येही भोपळाही फोडता आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विधानसभेत आपली ताकद वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह माजी मंत्री, खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यामध्ये केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचाही समावेश होता. त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
जॉर्ज कुरियन हे केंद्रात मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्ध मंत्रालयाचे राज्यमंत्री आहे. त्यांना कांजीरापप्ली मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले होते. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. याठिकाणी काँग्रेस रॉनी के. बेबी हे विजयी झाले आहेत. तर केरळा काँग्रेस (एम)चे एन जयराज दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कुरियन यांचा तब्बल २९ हजार ६६२ मतांनी पराभव झाला आहे.
तीन उमेदवार विजयी
केरळमधून भाजपसाठी आनंदाची बातमीही आहे. भाजपचे तीन आमदार पहिल्यांदाच विधानसभेत दिसणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री व केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर, माजी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन आणि भाजपचे स्थानिक नेते बी. बी. गोपाकुमार यांचा निवडणुकीत विजय झाला आहे.
तिन्ही उमेदवार विरोधी पक्षाच्या बालेकिल्यात विजयी झाले आहेत. चंद्रशेखर यांनी नेमॉम मतदारसंघातून विद्यमान मंत्र्यांचा पराभव केला आहे. चंद्रशेखर हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. मुरलीधरन यांनी कझकोट्टम मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी डाव्या पक्षाच्या मातब्बर उमेदवाराला पराभूत केले.
भाजपला छथनूर मतदारसंघातूनही आश्चर्यकारक विजय मिळाला आहे. गोपाकुमार यांनी मागील १५ वर्षांपासून आमदार असलेल्या सीपीआयच्या ताब्यातून हा मतदारसंघ हिसकावून घेतला आहे. मागील दोन निवडणुकाही गोपाकुमार यांनी लढविल्या होत्या. दोन्ही निवडणुकांमध्ये ते दुसऱ्या स्थानी होते. यावेळी मात्र त्यांनी विजय मिळवत ताकद दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे एलडीएफने १५ वर्षांनंतर या मतदारसंघातील उमेदवार बदलला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.