K C Venugopal Cogress CM Race  sarkarnama
देश

Kerala Election Results : काँग्रेस मोठा डाव खेळणार, सत्तेत आलेल्या राज्याचा मुख्यमंत्री ठरला! दिल्लीतील नेत्यावर मोठी जबाबदारी

K C Venugopal Cogress CM Race : केरळमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर येताना दिसत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून के सी वेणुगोपाल यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

Roshan More

Cogress News : पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये केवळ केरळमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. डाव्या आघाडीचा पराभव करत काँग्रेस सत्तेत येत असताना मुख्यमंत्रि‍पदाचा दावेदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्रि‍पदासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी असलेले रमेश चेन्निथला, सतीशन आणि के. सी. वेणुगोपाल यांची नावे आघाडीवर आहेत. के सी वेणुगोपाल हे काँग्रेस सरचिटणीस आहेत. त्यामुळे दिल्लीत त्यांच्यावर पक्षसंघटनेची जबाबदारी आहे.

वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना मैदानात उतरत अनेकांची बंड शांत केली होती. त्यामुळे ते मुख्यंत्रिपदाचे दावेदार असतील अशी चर्चा होती. काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात देखील त्यांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव सर्वात आघाडीवर असेल असे मानले जात आहे.

काँग्रेसची 99 जागांची आघाडी

केरळमध्ये 140 जागांसाठी निवडणूक होत आहे. बहुमताचा आकडा 70 आहे. दरम्यान, 140 जागांचे कल समोर आले असून तब्बल 99 जागांवर काँग्रेस आघाडीवर दिसून येत आहे. तर, डावी आघाडी 40 जागांवर आघाडीवर आहे, तर, इतर पक्ष 1 जागेवर आघाडीवर दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT