

DMK News : तमिळनाडून विधानसभा निवडणुकीत एडीएमके, काँग्रेस आघाडीला मोठा झटका बसत असल्याचे दिसत आहे. मागील दहा वर्ष सत्तेत असलेली स्टॅलिन यांची डीएमके सत्तेबाहेर जाताना दिसून येत आहे. तर, पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेली अभिनेता विजयची टीव्हीके सत्ता स्थापनेच्या दिशेने पुढे सरकत आहे.
234 जागांचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये डीएमके 51 जागांवर आघाडीवर असून एडीएमके 72 जागांवर आघाडीवर आहे. तर, टीव्हीकेने 100 चा आकडा पार केला आहे. बहुमतासाठी 117 जागांची आवश्यकता आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर एडीएकेची कामगिरी खालवली होती. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांची कामगिरी सुधारली आहे. जर विजयचा टीव्हीके सत्तेपासून अवघ्या काही जागांनी दूर राहिला तर एडीएमके त्याच्यासोबत आघाडी करत सत्तेत देखील बसू शकते.
निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधील काही नेत्यांमध्ये अभिनेता विजय यांच्यासोबत आघाडीवर करावी, अशी चर्चा होती. मात्र, दिल्लीतून स्टॅलिन यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, तमिळनाडूत विजयाच्या पक्षाची लाट दिसून येत आहे. ते सहज सत्ता स्थापन करतील असे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.