Congress minister M Liju Sarkarnama
देश

Excise Department Corruption : अधिकाऱ्यांची बारमालकांकडून वसुली, काँग्रेस मंत्र्यांचेही संबंध? केरळच्या राजकारणात खळबळ

A report alleges bribery by senior Keralam excise officials from bar owners. CPM leader M V Govindan also raises allegations involving Congress minister M Liju : उत्पादन शुल्क विभागातील कथित भ्रष्टाचारावरून माकप प्रदेश सचिव एम. व्ही. गोविंदन यांचा सरकारवर निशाणा.

Pradeep Pendhare

Keralam Excise Department : केरळमच्या उत्पादन शुल्क विभागातील दोन वरिष्ठ अधिकारी बारमालकांकडून लाच घेत असल्याचा आरोप करणारा अहवाल माजी उत्पादन शुल्क आयुक्त सीराम संबाशिव राव यांनी राज्य सरकारला सादर केला.

या प्रकरणात काँग्रेसचे उत्पादन शुल्कमंत्री एम. लिजू यांचेही बारमालकांशी संबंध असल्याचा आरोप माकपचे प्रदेश सचिव एम. व्ही. गोविंदन यांनी केला. मंत्री एम. लिजू हे केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत.

अहवालानुसार, संयुक्त उत्पादन शुल्क आयुक्त एस. विनोद यांचे मुवाट्टुपुझा येथील गंगा बारच्या मालकाशी जवळचे संबंध होते. बारच्या परवान्याशी संबंधित कामांसाठी त्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. बारमालकाकडून दरमहा 30 हजार रुपये तसेच बारच्या वेळा आणि परवान्याच्या मुदतवाढीसाठी 50 हजार रुपये घेतल्याचा दावा अहवालात करण्यात आला. अलप्पुझा येथील उपआयुक्त अजय यांच्यावरही लाचखोरीचे (Corruption) आरोप आहेत.

कायमकुलममधील रोमा सेंटर बारचे मालक रतीश यांच्याकडे तपासणीच्या वेळी 30 हजार रुपयांची मागणी केल्याचे अहवालात म्हटले. तसेच परवान्याच्या नूतनीकरणासाठी ओणमनंतर 20 हजार रुपये दिल्याचा उल्लेख आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची (Administrative Officers) क्षेत्रीय पदांवरून तातडीने बदली करून त्यांच्याविरोधात दक्षता विभागामार्फत चौकशी करण्याची शिफारस राव यांनी केली आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार लाचखोरी आणि बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचीही सूचना त्यांनी केली. दरम्यान, या अहवालातून मंत्र्यांचा भ्रष्टाचारातील सहभाग स्पष्ट होत असल्याचा आरोप गोविंदन यांनी केला.अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर दबाव असल्याचेही त्यांनी म्हटले.

यावर मंत्री लिजू यांनी आपण आपल्या मतदारसंघातील बारमालकांना ओळखत असल्याचे मान्य केले; मात्र त्यात असामान्य काही नसल्याचे स्पष्ट केले. अधिकाऱ्यांविरोधातील आरोपांची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT