Pune Doctor ISIS Case : ISIS च्या प्रचारयंत्रणेत पुण्यातील डॉक्टर सक्रिय; गुन्ह्याची कबुली, NIA कोर्टाकडून 6 वर्षांची शिक्षा!

Pune-based doctor Adnan Ali Sarkar has been sentenced six years Maharashtra ISIS terror module case. NIA investigation and ISIS propaganda magazines : 'व्हॉइस ऑफ हिंद' आणि 'व्हॉइस ऑफ खुरासान' या ISISच्या प्रचारात्मक मासिकांच्या प्रसारात सहभाग; दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील सहा आरोपींपैकी एकाला दोषी ठरवण्यात यश.
Pune Doctor ISIS Case
Pune Doctor ISIS CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra ISIS Terror Module Case : महाराष्ट्रातील ISIS दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आरोपी डॉ. अदनानअली सरकार याला दोषी ठरवण्यात यश मिळवले आहे.

मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यातील तरतुदींनुसार आणि भारतीय दंड संहितेतील कलमांनुसार दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला कमाल सहा वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेबरोबरच एकूण 65 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ISIS सदस्य भारताची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याचा कट रचत असल्याचे समोर आल्यानंतर NIA मुंबईने 28 जून 2023 रोजी स्वतःहून गुन्हा दाखल केला होता.

तपासादरम्यान या कटाचे व्यापक स्वरूप उघड झाले. या कटाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध असल्याचे तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या ISISच्या सूत्रधारांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपी ISIS ची कट्टरतावादी विचारसरणी प्रसारित करणे, संघटनेत भरती करणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे आणि 'व्हॉइस ऑफ हिंद' व 'व्हॉइस ऑफ खुरासान' यांसारखी ISISची प्रचारात्मक मासिके प्रसारित करण्यात सहभागी होते.

Pune Doctor ISIS Case
Ahilyanagar DCC Bank Chairman Election : विखेंना अध्यक्षपद हवंय, थोरातांकडे संख्याबळ; लंके मैदानात उतरले तर जिल्हा बँकेचा खेळ फिरणार?

या प्रकरणात तबिश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बरोडावाला ऊर्फ लालाभाई, शर्जील शेख, आकिफ अतीक नाचन, जुबेर नूर मोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसैबा आणि डॉ. अदनानअली सरकार या सहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Pune Doctor ISIS Case
Teacher Senior PAY Scale Bribe : शिक्षिकेच्या पगारवाढीवर संस्थाचालकांचा डल्ला? 50 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद

विशेष न्यायालयाने आरोपपत्रातील संबंधित कलमांनुसार अटक केलेल्या सर्व सहा आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते. हे सहाही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. डॉ. अदनानअली सरकार याला दोषी ठरवण्यात आले असले, तरी उर्वरित पाच आरोपींविरोधातील खटल्याची सुनावणी पुढे सुरू राहणार आहे.

डाॅ. अदनानअली सरकार कोण आहे

डॉ. अदनानअली सरकार हा पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारा भूलतज्ज्ञ डॉक्टर आहे. डॉ. अदनानअली सरकार याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. तो जुलै 2023 पासून कोठडीत असून, त्याने आधीच पूर्ण केलेला कालावधी मुख्य शिक्षेतून वजा केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.