BJP nominates woman named Sonia Gandhi Sarkarnama
देश

Sonia Gandhi News : वारं फिरलं! भाजपचे नेते, कार्यकर्ते करतायेत ‘सोनिया गांधीं’चा प्रचार; उमेदवारीने काँग्रेसची कोंडी...

Munnar Panchayat Election : भाजपने सोनिया यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस उमेदवार मंजुला रमेश यांची कोंडी झाली आहे.

Rajanand More

BJP candidate Sonia Gandhi : भाजपचा गांधी कुटुंबाशी ३६ चा आकडा आहे. पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली जाते. प्रामुख्याने राहुल गांधी सर्वाधिक टार्गेटवर असतात. पण सध्या सोशल मीडियात एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. ती म्हणजे ‘सोनिया गांधी’ यांना भाजपकडून उमेदवारी...

नेमका काय प्रकार?

महाराष्ट्राप्रमाणेच केरळमध्ये सध्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेचा विषय ‘सोनिया गांधी’ नावाच्या महिला उमेदवाराचा ठरत आहे. मुन्नार पंचायतीच्या निवडणुकीत सोनिया गांधी नावाच्या महिला भाजपच्या उमेदवार आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नावाशी साधर्म्य असले तरी या महिला उमेदवाराची राजकारणातील दिशा पूर्णपणे वेगळी आहे.

काँग्रेसशी जुने नाते

भाजपच्या उमेदवार सोनिया गांधी यांचे वडील दिवंगत दुरै राज हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. सोनिया गांधी यांच्या नावावरून त्यांनी आपल्या लेकीचे नावही सोनिया गांधी असे ठेवले. लग्न होईपर्यंत त्याही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसच्या विचारांसोबतच होत्या. पण विवाहानंतर त्यांची दिशाच बदलली.

उमेदवार सोनिया यांचे पती हे भाजपचे कार्यकर्ते असून मुन्नार शाखेचे सरचिटणीस आहेत. त्यांनी दीड वर्षांपूर्वी मुन्नार मुलकड्डा वॉर्डमधील भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढविली होती. आता पतीच्या पावलावर पाऊल टाकत सोनिया यांनीही भाजपची उमेदवारी मिळवत जोमाने प्रचार सुरू केला आहे. सोनिया गांधी या नावामुळे सध्या केरळच्या निवडणुकीत त्यांची जोरदार चर्चा आहे.

BJP Candidate Sonia Gandhi

भाजपने सोनिया यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस उमेदवार मंजुला रमेश यांची कोंडी झाली आहे. भाजपच्या उमेदवाराचा चेहरा सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतेक मतदारांपर्यंत पोहचला आहे. त्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. नामसाधर्म्यामुळे काँग्रेसच्या मतदारांचा संभ्रम निर्माण होऊन मतांची विभागणी होण्याची भीती काँग्रेसला उमेदवाराला आहे.  

दरम्यान, केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ९ व ११ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत होणार आहे. तर मतमोजणी १३ डिसेंबरला आहे. दोन्ही टप्प्यांमध्ये प्रत्येकी सात जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा पंचायत, नगरपंचायत, महापालिका अशा १ हजार १९९ स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT