Rajya Sabha Live : फौजिया खान यांना राजीव शुक्लांनी काय सांगितलं? विषयच बदलला, सभापती संतापले...

Winter Session Parliament : लोकसभेतही विरोधकांकडून एसआयआरवर चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र अध्यक्षांनी तिथे परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकसभेचे कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले आहे.
Rajya Sabha Fauzia Khan
Rajya Sabha Fauzia KhanSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Fauzia Khan : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत दुसऱ्या दिवशी विरोधकांनी पुन्हा एकदा मतदारयाद्या पुनर्पडताळणीचा मुद्दा उपस्थित करून जोरदार गोंधळ घातला. या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी परवानगी दिली नाही. 

राज्यसभेत मंगळवारी कामकाज सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान बोलण्यासाठी उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी सभागृहात मोठा गोंधळ सुरू होता. विरोधकांकडून ‘एसआयआर’वर चर्चेचा आग्रह केला जात होता. त्यासाठी जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. अनेक सदस्य सभापतींसमोरील रिकाम्या जागेत आले होते.

सभापतींकडून या गोंधळातच काही सदस्यांना त्यांनी नमूद केलेल्या विविध विषयांवर बोलण्यासाठी संधी दिली जात होती. त्यानुसार फौजिया खान यांचेही या यादीत नाव होते. सभापतींनी त्यांना संधी दिली. मात्र, गोंधळ सुरू असल्याने त्या शांतपणे उभ्या राहिल्या. सभागृहात गोंधळ सुरू असल्याचे त्यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले.

Rajya Sabha Fauzia Khan
Local Body Elections : मतमोजणी लांबणीवर! हायकोर्टाने नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली; आयोगाला जोरदार दणका

फौजिया खान या बोलत नसल्याचे पाहून सभापती राधाकृष्णन चांगलेच संतापलेले दिसले. फौजिया खान, तुम्ही बोला, तुम्हाला बोलायचे नसेल तर सांगा, असे राधाकृष्णन म्हणाले. पण त्या त्यांचा मुद्दा उपस्थित करू शकल्या नाहीत. त्याचवेळी काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला त्यांच्याजवळ आले आणि काहीतरी पुटपुटले. त्यानंतर फौजिया खान यांनी थेट एसआयआरचा मुद्दा मांडला.

विरोधकांकडून ज्यासाठी गोंधळ घातला जात होता, त्यावर बोलण्याची संधी देण्याची विनंती त्यांनी केली. यापूर्वी निश्चित केलेल्या विषयावर न बोलता त्यांनी वेगळात मुद्दा मांडल्याने सभापतींना त्यांचे बोलणे मध्येच थांबवून पुढील सदस्यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी विरोधकांनी मात्र एसआयआरवर आपला विरोध कायम ठेवला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.

Rajya Sabha Fauzia Khan
Election Commmission : निवडणूक आयोगाकडून अधिकृत यादी प्रसिध्द; राज्यातील ‘या’ 24 नगराध्यक्ष अन् 154 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान… 

लोकसभेतही विरोधकांकडून एसआयआरवर चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र अध्यक्षांनी तिथे परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकसभेचे कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहात विरोधकांनी एसआरआरचा मुद्दा मांडला होता.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com