The deadly stampede at Kolkata’s Chorbagan Durga Puja pandal has triggered a political controversy, with TMC questioning the roles of people allegedly linked to BJP leaders. Sarkarnama
देश

Kolkata Durga Puja stampede : चेंगराचेंगरी प्रकरण : आयोजकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतण्यासह भाजप आमदार, विरोधकांच्या दाव्याने सरकार अडचणीत

Chorbagan stampede, Suvendu Adhikari, Mamata Banerjee : पोलीस आणि प्रशासन या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या मुख्य आयोजकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप तृणमूलने केला आहे.

Rajanand More

West Bengal news : पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक चोबगान सार्वजनिक दुर्गोत्सव समितीच्या वतीने आयोजित कोलकाता दुर्गा फेस्टिवलमध्ये शनिवारी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत १९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून आता राजकारण तापू लागले आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने थेट मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या पुतण्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये तीन व्यक्तींचे नावे घेण्यात आली आहे. कोलकाता पोलीस तीन नावांवर कारवाई करणार का, की बेकायदेशीर मुख्यमंत्र्‍यांना त्यांना वाचविणार?, असा सवाल या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच समितीचे मुख्य संरक्षक देवदीप अधिकारी हा मुख्यमंत्र्‍यांचा पुतण्या, समिती अध्यक्ष विजय ओझा हे भाजपचे आमदार आणि मुख्य सल्लागार तमोघना घोष हे उत्तर कोलकाताचे भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

तिघेही तेवढेच दोषी नाहीत का, असा सवाल करत तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, मुख्यमंत्र्‍यांनीच या मंडपाचे उद्घाटन केले होते. मंडपामध्ये गेल्यानंतर त्यांनी सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांबाबत पाहिले नाही का? गमावलेल्या प्रत्येक जीवासाठी त्यांना जबाबदार धरले जाणार नाही का?.

चोरबगान समितीवर नुकताच भाजप नेत्यांनी कब्जा केला होता. पोलीस आणि प्रशासन या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या मुख्य आयोजकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप तृणमूलने केला आहे. पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनीही सोशल मीडियात पोस्ट करत मुख्यमंत्र्‍यांवर निशाणा साधला आहे.

बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा पुतण्या देवदीप अधिकारी यांचे नाव पूजा समितीशी जोडले गेल्याचे समोर आले आहे. आपल्या दोषी पुतण्याला जेलमध्ये कधी टाकणार, असा सवाल बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री अधिकारी यांनी विचारला आहे. तृणमूलचे नेते कुणाल घोष यांनीही केवळ सुरक्षारक्षकांना बळीचा बकरा बनविले जात असल्याची टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्‍यांनी घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. तसेच चौकशी अहवाल सार्वजनिक केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT