Rahul Gandhi news : राहुल गांधींच्या 'सरप्राईज स्ट्रॅटेजी'ने भाजपला जोरदार धक्का; कॉक्रोच जनता पार्टीही घायाळ...

BJP, Election Commission of India, Gyanesh Kumar, CJP protest, India Alliance : जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनापासून त्याची सुरूवात झाली. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमारानंतर राहुल गांधींनी सर्वपक्षीय नेते, खासदारांसह थेट पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.
PM Narendra Modi, Rahul Gandhi, Abhijeet Dipke
PM Narendra Modi, Rahul Gandhi, Abhijeet DipkeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi surprise strategy : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषदेत बोलताना बहीण प्रियांका गांधी यांच्यासोबत झालेला संवाद सांगितला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची पुढची स्ट्रॅटेजी काय असावी, याबाबत प्रियांका यांच्याकडून विचारणा करण्यात आली होती. त्यावर आपण प्रियांकाला कसलेही नियोजन नाही, असे उत्तर दिल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. पत्रकारांनी राहुल गांधींना पुढचे नियोजन काय असेल, असे विचारल्यानंतर त्यांनी 'सरप्राईज', असे उत्तर दिले होते.

राहुल गांधी यांची हीच 'सरप्राईज स्ट्रॅटेजी' किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 'गनिमी कावा' भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र तयार झाले आहे. विशेष म्हणजे या स्ट्रॅटेजीने कॉक्रोच जनता पार्टीही घायाळ होऊ लागली आहे. राहुल यांनी भाजपसह मीडियाचाही सगळा फोकस आपल्याकडे खेचून घेतला आहे. आता राहुल गांधी यांची पुढची रणनीती काय असेल, याची उत्सुकता दिल्लीतील मीडियाला असते.

अशी झाली सुरूवात

राहुल गांधी यांच्या या बदलत्या आक्रमक शैलीची सुरूवात मागील काही वर्षांत झाली आहे. विशेषत: मतचोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर लोकसभेत बोलताना त्यांची आक्रमता, संसदेच्या आवारातील आंदोलनातील सक्रीयता पाहता त्यांनी सरकारविरोधात अधिक आक्रमक होण्याचे ठरविले असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या जुलै महिन्यातील आंदोलनाने त्याला खतपाणी घातले अन् तिथूनच त्यांच्या 'सरप्राईज स्ट्रॅटेजी'ला सुरुवात झाली.

PM Narendra Modi, Rahul Gandhi, Abhijeet Dipke
पतीचे भयंकर कांड; कोण आहेत 'या' कॅबिनेट मंत्री? स्वत:च दिली पोलिसांत तक्रार...

जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनापासून त्याची सुरूवात झाली. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमारानंतर राहुल गांधींनी सर्वपक्षीय नेते, खासदारांसह थेट पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रस्त्यावरील आक्रमक लढाईची इथूनच खऱ्याअर्थाने सुरूवात झाली. त्यावर सत्ताधारी भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले. पण राहुल यांनी मीडियाचे संपूर्ण लक्ष आपल्याकडे खेचले होते. विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र तयार केले होते. जंतर मंतरवरील आंदोलकांचेही लक्ष वेधून घेतले होते.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक संसदेतही आक्रमक झाले होते. सीजेपीचे आंदोलन या राजीनाम्यासाठी कारणीभूत ठरले असले तरी इंडिया आघाडीची संसदेतील आक्रमकताही तितकीच महत्वाची होती. या राजीनाम्यानंतरही त्यानंतरही राहुल यांनी सरकारविरोधात आरोपांची धार कमी होऊ दिली नाही. निवडणूक आयोगाविरोधात त्यांनी मोर्चा उघडला.

PM Narendra Modi, Rahul Gandhi, Abhijeet Dipke
Vinod Tawde news : भाजपला केवळ 3 जागा, पक्षाने जनतेचा कौल स्वीकारला! प्रभारी असताना झालेल्या पराभवाकडे बोट दाखवत विनोद तावडेंचा काँग्रेसवर घाव

ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरही इंडिया आघाडीने मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधींसह काँग्रेस नेत्यांनी आकाशवाणी भवनमध्ये ठिय्या मारला. अनेक तास ते तिथेच होते. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मागील आठवड्यातही विरोधकांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रॅली काढत निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल केली. यावेळी सर्वच विरोधी पक्षांनी मिळून मोठे शक्तिप्रदर्शन केले. या सर्व घडामोडींमध्ये राहुल गांधी यांचा पुढाकार असल्याचे सांगितले जाते.

त्यांच्याकडून नेत्यांना फोनाफोनी होत होती. बैठकांचे नियोजन होत होते. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सलग दोन दिवस सर्व नेत्यांना जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले. तिथेच मोर्चाचे नियोजन झाले. राहुल गांधी यांनी आपल्या घरी चहापानासाठी इंडिया आघाडीतील नेत्यांसह अन्य संघटनांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले होते. असे पहिल्यांदाच घडले होते. त्यामुळे या घडामोडींना महत्व प्राप्त झाले आहे.

कॉक्रोच जनता पार्टी घायाळ

एवढेच नाही तर राहुल यांनी सर्व आंदोलने एकच असल्याचे सांगत कॉक्रोच जनता पार्टीला सूचक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अटक केल्यानंतरही त्यांनी पोस्ट केली होती. त्यावर अभिजीत दिपकेंनी त्यांचे आभार मानले होते. विद्यार्थी आंदोलनात आक्रमक चेहरा म्हणून समोर आलेल्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा याही इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये पहिल्यांदाच सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे त्या प्रियांका गांधींसोबत दिसत होत्या. राहुल गांधी यांचा एक हात बहिणीच्या खांद्यावर आणि दुसरा हात नेहा बोरा यांच्या खांद्यावर होता.

नेहा बोरा यांची राहुल यांच्या घरी चहापानालाही हजेरी लावली होती. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत नेहा यांना बोलण्याचीही संधी देण्यात आली. राहुल गांधी हेच त्यासाठी आग्रही होते, असे दिसून आले. एकप्रकारे त्यांनी सीजेपी आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. राहुल गांधी यांच्या या बदलत्या पण आक्रमक रणनीतीने भाजपला मात्र धक्के बसत आहेत. सातत्याने पत्रकार परिषदा घेत राहुल यांना प्रत्युत्तर द्यावे लागत आहे. SIR च्या मुद्यावर निवडणूक आयोग कमी अन् भाजपच्या पत्रकार परिषदा, सोशल मीडियातील पोस्ट वाढल्या आहेत. विविध कार्यक्रमांमध्येही त्याचा उल्लेख होत आहे.

राहुल गांधी यांचा हा आक्रमकपणा आणखी किती दिवस टिकणार, याबाबतही उत्सुकता आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक राहुल गांधी यांच्या स्ट्रॅटेजीची एकप्रकारे परीक्षा असणार आहे. या परीक्षेचा निकाल काय लागतोय, यावर त्यांच्यासह इंडिया आघाडीचीही राजकीय रणनीती अवलंबून असणार आहे. त्यासाठी त्यांना एकट्याने लढून चालणार नाही, तर इंडिया आघाडीसह सरकारविरोधात असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षासह इतरांनाही सोबत घेऊन रणनीती आखावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com