Police presence outside the Kolkata law college where a student was reportedly gang-raped, sparking public outrage and demands for justice.  sarkarnama
देश

Kolkata Rape Case - कोलकातामध्ये पुन्हा संतापजनक घटना; लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार!

Gang rape of student in law college of Kolkata - या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, तिन्ही आरोपींची ओळख पटलेली आहे.

Mayur Ratnaparkhe

Kolkata Law College Gang Rape Case - दक्षिण कोलाकातामधील कसबा भागात असणाऱ्या साउथ कोलकाता लॉ कॉलेजम्ये एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री साडेसात ते साधारण ११ वाजेपर्यंत कॉलेज कॅम्पसमध्ये ही संतापजनक घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरून कसबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटकही केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकजण याच कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे तर उर्वरीत दोघे सध्या कॉलेजमध्ये शिकत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख पटली असून, मनोजित मिश्रा हा कॉलेजचा माजी युनिट अध्यक्ष होता. याशिवाय जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी उर्फ प्रमित मुखोपाध्याय अशी उर्वरीत दोन आरोपींची नावे आहेत. यातील मिश्रा आणि अहमद यांना गुरुवारी संध्याकाळीच तलबागन क्रॉसिंगजवळ अटक करण्यात आली. तर प्रमितला आज सकाळी २७ जून रोजी पहाटे साडेबारा वाजता त्याच्या घरातून अटक केली गेली. या तिघांचेही मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. तर न्यायालयाने तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ही सामूहिक बलात्काराची घटना कॉलेजच्या इमारतीतच घडली. या घटनेतील पीडितेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली गेली आहे आणि अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. घटनास्थल सील करण्यात आले असून, फॉरेन्सिक तपासणी रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

या घटनेतील अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना गुरुवारी अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेवरून आता पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलेलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, आम्ही हा मुद्दा उचलून धरणार आहोत असा इशाराही दिला आहे. तर भाजप नेते अमित मालवीय यांनी आरोप केला आहे की, या घटनेत तृणमूल काँग्रेसशी संबंधित एक व्यक्तीही सहभागी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT