Modi Government Minister L.Murugan Resign  Sarkarnama
देश

Modi Government News: मोठी बातमी: आंदोलनं, मोर्चांनी घेरलेल्या मोदी सरकारला धक्का, आणखी एका मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली

NDA Government Politics: विरोधकांच्या इंडिया आघाडीसह कॉक्रोच जनता पार्टीनं एकापाठोपाठ एक आंदोलनं, मोर्चे यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं आहे. सीजेपीच्या जंतर मंतरवरील आंदोलनामुळे 12 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता.

Deepak Kulkarni

New Delhi News: विरोधकांच्या इंडिया आघाडीसह कॉक्रोच जनता पार्टीनं एकापाठोपाठ एक आंदोलनं, मोर्चे यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरलं आहे. सीजेपीच्या जंतर मंतरवरील आंदोलनामुळे 12 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला होता. आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह एसआयआर प्रक्रियेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांनी मोदी सरकारसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. याचदरम्यान,सरकारमधील आणखी एका मंत्र्यानं राजीनामा दिला आहे.

केंद्रातील मोदी सरकारला मंगळवारी(ता.13 ऑक्टोबर)मोठा धक्का बसला आहे.माहिती व प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री एल.मुरुगन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबतच त्यांनी राज्यसभा सदस्यत्व सोडलं आहे. त्यांनी आपल्या या दोन्ही दोन्ही राजीनामे एकाच वेळी सादर केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

केंद्र सरकारमध्ये दीर्घकाळ राज्यमंत्री म्हणून एल.मुरुगन यांनी कार्यभार सांभाळला आहे. मोदी सरकारच्या तिसर्‍या टर्ममध्ये त्यांच्यावर माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

तामिळनाडूमधून एल. मुरुगन हे 2021 मध्ये सर्वात पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी 2024 मध्ये मिळाली. आता 13 ऑक्टोबर 2026 रोजी एल. मुरुगन यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदासह राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी तामिळनाडूमध्ये भाजपचं पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे.

एल.मुरुगन यांनी त्यांच्या मंत्रि‍पदासह राज्ससभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्यापाठीमागचं कारणही स्पष्ट केलं आहे. त्यांनी राजीनाम्याचा हा तडकाफडकी निर्णय लोकसभेच्या 2029 च्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी तामिळनाडूत भाजपचं जाळं मजबूत करण्याच्या हेतूनं घेतला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे तामिळनाडूतील त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होईल.

मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, सध्यातरी राजीनाम्याचे अधिकृत कारण म्हणून त्यांनी तामिळनाडूमध्ये पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तसेच त्यांनी सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये एल.मुरुगन यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारतमातेची आणि तामिळनाडूची सेवा करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा गौरव असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एका रोजंदारी मजुराचा मुलगा ते केंद्रीय मंत्रिमंडळात सेवा करण्यापर्यंतचा राजकीय प्रवास करणं हे त्यांचं सर्वात मोठं सौभाग्य असल्याची भावनाही व्यक्त केली आहे.

एल.मुरुगन यांची 12 मार्च 2020 रोजी तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. या पदावर पोहोचणारे ते अरुंथथियार समुदायातील पहिले नेते ठरले. त्यानंतर जुलै 2021 मध्ये त्यांना केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळालं होतं. माहिती व प्रसारण तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय या खात्यांशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 2024 मध्ये ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT