Bihar News : बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या संयुक्त जनता दल या पक्षाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नितीश कुमार यांनी पक्षाची धुरा हाती घेतली आहे. ललन सिंह यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
'जेडीयू'च्या (JDU) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत सुरू आहे. या बैठकीत ललन सिंह (Lalan Singh) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले. त्यांच्या प्रस्तावावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याने आता नितीश कुमार (CM Nitish Kumar) पक्षाचे अध्यक्ष असतील.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये ही मोठी घडामोड मानली जात आहे. ललन सिंह यांची राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी जवळीक वाढत चालल्याचे बोलले जात होते.
तसेच ते लोकसभेच्या निवडणुकही आरजेडीकडून लढवणार असल्याच्या चर्चा होत्या.सिंह हे आणखी काही काळ अध्यक्ष राहिल्यास लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आधी पक्षात फुट पडू शकते, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.