ED Notice Land Scam : अरविंद केजरीवाल यांना दोनदा ईडीची नोटीस आली. त्यानंतरही ते ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिलेले नाहीत. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना ईडीने नोटीस देऊन 5 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना नोकरी देऊन जमीन घेतल्याच्या प्रकरणी ही नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) 2004 ते 2009 या कालावधीत रेल्वेमंत्री होते. त्यावेळी नोकरी देऊन जमीन घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यावर ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. लालू प्रसाद यांनी मुलगा तेजस्वी यादव Tejashwi yadav), मुलगी मीसा भारती तसेच पत्नी राबडी देवी यांच्या नावावर जमीन घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लालूंना देखील ईडीने नोटीस दिली होती.
'नोकरीच्या बदल्यात जमीन' या घोटाळ्यात तेजस्वी यादव यांना नोटीस देऊन 22 डिसेंबरला ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, वकिलांच्या मार्फत त्यांनी वेळ वाढवून मागितला होता. आता पुन्हा त्यांना ईडीने पाठवली असून 5 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
लोकसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे आता नोटीस येतच राहतील, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी ईडीच्या नोटीसीची खिल्ली उडवली. याआधी देखील नोटीस मिळाल्यानंतर आम्ही उपस्थित राहिलो होतो. पुढे ही राहू. पूर्वी देखील चौकशीतून काही निघाले नाही आता देखील काही निघणार नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.