Himanta Sarma News : आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; गीतेच्या श्लोकांचा चुकीचा अनुवाद..

Wrong translation 'Sloka' of Bhagavad Gita : असदुद्दीन ओवैसी यांची हिमंता सरमा यांच्यावर टीका.
Himanta Sarma
Himanta SarmaSarkarnama
Published on
Updated on

Himanta Sarma News : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भगवत गीतेतील 'श्लोक'च्या चुकीच्या भाषांतराबद्दल माफी मागितली आहे. गीतेच्या या श्लोकाच्या चुकीच्या भाषांतरावरून वाद निर्माण झाला होता, त्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. सरमा यांनी गीताच्या श्लोकाशी संबंधित 'एक्स हॅन्डल'वरची पोस्ट केली होती.

याबाबत त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला. अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जातीभेदाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. हिमंता सरमा (Himanta Sarma) यांनी सांगितले की, हा श्लोक त्यांच्या टीमने त्यांच्या 'एक्स हॅन्डल'वर पोस्ट केला आहे जेणेकरून प्रत्येक दिवशी एक भगवत गीता (Bhagavad Gita) श्लोक फॉलोअर्ससोबत शेअर करण्याची परंपरा कायम राहावी.

Himanta Sarma
Ahmednagar Politics: नगर महापालिकेत प्रशासकीय राज; तारखेच्या गोंधळात महापालिकेची मुदत संपुष्टात

'नित्यक्रमानुसार मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर दररोज सकाळी भगवत गीतेचा एक श्लोक अपलोड करतो. आजपर्यंत मी 668 श्लोक पोस्ट केले आहेत. अलीकडेच माझ्या टीम सदस्यांपैकी एकाने अध्याय 18 श्लोक 44 मधील चुकीच्या भाषांतरासह श्लोक पोस्ट केला आहे. चूक लक्षात येताच मी लगेच पोस्ट हटवली.

महापुरुष श्रीमंत शंकरदेव यांच्या नेतृत्वाखालील सुधारणा चळवळीमुळे आसाम (Assam) राज्य जातिहीन समाजाचे परिपूर्ण चित्र प्रतिबिंबित करते. हटवलेल्या पोस्टमुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो', अशा शब्दात सरमा यांनी एक्स हॅन्डवर माफी मागितली आहे. तसेच चूक लक्षात येताच ट्विट हटवले, असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, काढलेल्या पोस्टमुळे राजकीय वाद निर्माण करणाऱ्या हिमंता सरमा यांच्या पोस्टमध्ये त्यांनी एका विशिष्ट जातीचा चुकीचा उल्लेख केला होता. याबाबत 'एमआयएम' नेते आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी गीतेच्या श्लोकावरून हिमंता सरमा यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, प्रत्येक भारतीय नागरिकाला समान वागणूक देण्याची शपथ आपण पूर्ण करत नाही.

संविधानिक पदावर असताना, प्रत्येक नागरिकाला समान वागणूक देण्याची तुमची शपथ आहे. गेल्या काही वर्षांत आसामच्या मुस्लिमांना ज्या दुर्दैवी क्रूरतेचा सामना करावा लागला आहे त्यावरून हे दिसून येत, असल्याचे ओवैसी यांनी सांगितले.

Himanta Sarma
Basanagouda yatnal: कोरोना भ्रष्टाचाराचा 'व्हायरस' भाजप आमदाराच्या अंगलट; पक्षश्रेष्ठी कारवाई करणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com