Lalu Prasad Yadav  Sarkarnama
देश

Land for Job Scam : लोकसभा निवडणूक संपताच लालू प्रसाद यादवांविरोधात 'CBI' आली 'Action Mode'वर!

Lalu Prasad Yadav and CBI : जाणून घ्या, सीबीआयने आता कोणतं पाऊल उचललं आहे?

Mayur Ratnaparkhe

Lalu Prasad Yadav and Land for Job Scam : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी संपताना दिसत नाही. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि देशात पुन्हा एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर, सीबीआयने 'Land for Job' घोटाळा प्रकरणातील कारवाई पुन्हा एकदा वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणेने लालू प्रसाद यादव आणि अन्य आरोपींविरोधात अंतिम आरोपपत्र दाखल केलं आहे.

लालू प्रसाद यादव(Lalu Prasad Yadav) यांच्यावर आरोप आहेत की, केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी अनेकजणांना जमिनीच्या बदल्यात नोकरदी दिली होती. शिवाय ही जमीन त्यांनी बाजारभावापेक्षा अतिशय कमी दराने खरेदी केली होती. याप्रकरणी लालू यादव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले आहे.

याच दरम्यान सीबीआयने अंतिम आरोपपत्रात 38 उमेदवार आणि अन्य व्यक्तिंसह 78 आरोपींचा समावेश केला आहे. तेच सीबआयाने न्यायालयास सांगितले की सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. न्यायालय आता लॅण्ड फॉर स्कॅम प्रकरणावर 6 जुलै आरोपपत्रावर विचार करणार आहे.

या प्रकरणामध्ये लालू प्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती(Missa Bharti) व रेल्वेच्या एका माजी महाव्यवस्थापकाचे नावे आहेत. तर केंद्रीय तपास यंत्रणांनी 23 सप्टेंबर 2021 रोजी या घोटाळ्याशी संबंधित प्राथमिक चौकशी करत 18 मे रोजी एफआयआर दाखल केला होता.

तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, 'लँड फॉर जॉब' घोटाळा प्रकरणामध्ये रेल्वे अधिकार्‍यांनी अर्ज केल्यानंतर तीन दिवसांमध्ये ग्रुप डी पदांवर पर्यायी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या बदल्यात उमेदवारांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांची जमीन हस्तांतरित केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT