Soumitra Khan, Sujata Mondal Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजप खासदाराला भिडणार घटस्फोटित बायको; ही लढत कुठे रंगणार?

TMC Leader Sujata Mondal : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांचा भाजपचे उमेदवार सौमित्र खान यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचा आता घटस्फोट झाला आहे.

Rajanand More

Kolkata News : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे अनेकदा पाहायला मिळते, पण थेट लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) असा योग दुर्मीळच. पश्चिम बंगालमध्ये असाच काहीसा योगायोग जुळून आला आहे. एक घटस्फोटित दाम्पत्य लोकसभेच्या निवडणुकीत एकमेकांना भिडणार आहे. हे भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहे. त्यामुळे या लढतीकडे मतदारांचेही लक्ष लागले आहे. 

बंगालमधील (West Bengal) बिष्णुपूर मतदारसंघात ही लढत रंगणार आहे. भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सौमित्र खान (Soumitra Khan) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर काल टीएमसीनेही (TMC) डाव टाकत त्यांच्या घटस्फोटित पत्नीलाच उमेदवारी दिली. सुजाता मंडल (Sujata Mondal) या निवडणुकीत त्यांना भिडणार आहेत.

राज्यात 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी (Assembly Election) सौमित्र आणि सुजाता यांचा घटस्फोट झाला आहे. सुजाता या तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर खान यांनी त्यावेळी कॅमेऱ्यासमोरच त्यांना घटस्फोट देत असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच दोघे राजकीय वैरी बनले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सौमित्र खान हे बिष्णुपूरमधील दिग्गज नेते मानले जातात. ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी तृणमूलमध्ये भाजपमध्ये (BJP) दाखल झाले होते. त्यावेळी सुजाता यांनीही त्यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत सौमित्र यांनी बाजी मारली. आता सौमित्र खान पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. पण त्यांना थेट सुजाता यांचाच सामना करावा लागणार आहे.

सौमित्र खान यांचा या वेळी पराभव करण्यासाठी तृणमूलने घटस्फोटित पत्नीलाच उमेदवारी दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. सौमित्र खान यांनी मागील निवडणुकीत तृणमूलच्या उमेदवाराचा पराभव केला होता, तर 2014 मध्ये त्यांनी तृणमूलच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यांच्या राजकीय प्रवासाला काँग्रेसमधून सुरुवात झाली आहे. 213 मध्ये त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकत तृणमूलमध्ये प्रवेश केला होता.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT