Lok Sabha Election 2024 : भाजपमधील गटबाजी उफाळली; थेट केंद्रीय मंत्र्यांच्या उमेदवारीलाच तीव्र विरोध

Shobha Karandlaje News : शोभा करंदलाजे या दोन टर्म खासदार असून त्यांच्याच नावाला आता विरोध होऊ लागला आहे. आता भाजपचे नेतृत्व काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
Shobha Karandlaje
Shobha KarandlajeSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : भाजपने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पुढील एक-दोन दिवसांत दुसरी यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता दुसरी यादी जाहीर होण्यापुर्वीही पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे. यावेळी थेट केंद्रीय मंत्र्यांच्या उमेदवारीलाच तीव्र विरोध करण्यात आला आहे.

उडपी-चिकमगलुरूच्या खासदार आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे (Shobha Karandlaje) यांना या विरोधाचा सामना करावा लागत आहे. भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांनी त्यांच्याविरोधा ‘गो बॅक’ ही मोहिम सुरू केली आहे. रविवारी पक्षाच्या कार्यालयात अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Shobha Karandlaje
Lok Sabha Election 2024 : सिन्हा, पठाण, आझादांमुळे ममतांची कोंडी; मोदींना टार्गेट केलं, आता त्याच अडकल्या...

कार्यकर्त्यांकडून पोस्टकार्ड आणि सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ‘गो बॅक’ ही मोहिम राबवली जात आहे. रविवारी स्थानिक आमदार अरगा ज्ञानेंद्र आणि भाजप नेते भानू प्रकाश यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात भाजपची बैठक झाली. या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी करंदलाजे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चिकमगलुरूमधील स्थानिक नेत्यालाच उमेदवारी मिळायला हवी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. करंदलाजे या दहा वर्ष खासदार असूनही त्यांचा ब्लॉक कमिटीतील नेत्यांशी कसलाही संपर्क नाही, असा दावाही या कार्यकर्त्यांनी केला. भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य बी. एस येडीयुरप्पा (BS Yediyurppa) यांनी करंदलाजे या तीन लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील, असे विधान नुकतेच केले आहे.

पक्षाकडून अद्याप लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली नसताना येडीयुरप्पा यांनी केलेल्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. करंदलाजे यांची उमेदवारी जाहीर झाली असे समजायचे का, असा सवाल करत भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता दुसऱ्या यादीत करंदलाजे यांचे नाव आल्यास पक्षातील नाराजी उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shobha Karandlaje
Congress News : काँग्रेसला मोठा झटका; एकाचवेळी सहा माजी आमदारांसह 32 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com