Lok Sabha Election 2024 : सिन्हा, पठाण, आझादांमुळे ममतांची कोंडी; मोदींना टार्गेट केलं, आता त्याच अडकल्या...

Trinamool Congress News : ममता बॅनर्जी यांनी आज तृणमूलच्या 42 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण आणि कीर्ती आझाद यांचाही समावेश आहे.
Mamata Banerjee, Yusuf Pathan, Kirti Azad Shatrughna Sinha
Mamata Banerjee, Yusuf Pathan, Kirti Azad Shatrughna SinhaSarkarnama
Published on
Updated on

West Bengal News : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘आऊटसायडर’ असे म्हणत हल्ला चढवला होता. आता लोकसभेच्या निवडणुकीतही (Lok Sabha Election 2024) पक्षाचा प्रचार याच दिशेने राहणार असल्याने संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. पण तृणमूलनेच आज भाजपच्या हाती आयते कोलीत दिल्याने कोंडी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूलला एक पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे दिसते.   

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज लोकसभेच्या 42 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण, कीर्ती आझाद (Kirti Azad) यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. या तिघांची नावे उमेदवारी यादी आल्यानंतर भाजपने (BJP) जोरदार पलटवार केला आहे.

Mamata Banerjee, Yusuf Pathan, Kirti Azad Shatrughna Sinha
Congress News : काँग्रेसला मोठा झटका; एकाचवेळी सहा माजी आमदारांसह 32 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

तृणमूलचे (TMC) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी आजच मोदींचा उल्लेख करताना म्हटले की, ‘बंगालला कोण हवे आहे? मोदी की दीदी? बंगाली मातीतील सुपुत्र की बाहेरचा (आऊटसायडर)?’. या टीकेला उत्तर देताना भाजपच्या नेत्यांनी पठाण (Yusuf Pathan), सिन्हा आणि आझादांच्या खांत्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी म्हटले आहे की, टीएमसीच्या यादीत सात उमेदवार हे आधी भाजपमध्ये होते. तृणमूलला उमेदवारही मिळत नाहीत. शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद आणि युसुफ पठाण हे बाहेरचे आहेत. टीएमसीला बंगालमधील सुपुत्र सापडले नाहीत का?, असा सवाल मालवीय यांनी केला.

बहरामपूरचे उमेदवार युसूफ पठाण हे गुजरातमधील बडोद्याचे आहेत की पश्चिम बंगालमधील? टीएमसीची यादीमध्ये ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे बाहेरच्यांचाच भरणा आहे. त्यांच्या या राजकारणामुळे बंगाल पिछाडीवर जात आहे, अशी टीका मालवीय यांनी केली आहे.

सात नेते भाजपमधील

तृणमूलच्या उमेदवारी यादीतील सात नेते हे आधी भाजपमध्ये होते. शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, कृष्णा कल्याणी, मुकुट मणी अधिकारी, सुजाता मोंडल, बिस्वजित दास आणि बिप्लव मित्रा हे सात जण आधी भाजपमध्ये होते. टीएमपीकडे पुरेसे उमेदवार नाही, असे मालवीय यांनी म्हटले आहे.

Mamata Banerjee, Yusuf Pathan, Kirti Azad Shatrughna Sinha
TMC Candidate List 2024 : TMC च्या 42 उमेदवारांचे रॅम्पवाॅक; युवा नेते अभिषेक बॅनर्जी यांचा मोदींच्या 'गॅरंटी' वर पलटवार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com