Liquor Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : सत्ता आल्यास कमी किंमतीत चांगली दारू; भाजपच्या मित्रपक्षाचे आश्वासन

Telugu Desam Party News : आंध्र प्रदेशात भाजपने टीडीपीशी आघाडी केली आहे. ही आघाडी जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला टक्कर देत आहे.

Rajanand More

Andhra Pradesh News : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) आपल्या पक्षाकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून अनेक आश्वासने दिली जातात. तर कधी प्रचारादरम्यान पैसे वाटप, जेवणावळी, दारू दिली जाते. आता भाजपच्या एका मित्रपक्षाने सत्तेत आल्यानंतर कमी किंमतीत चांगल्या दर्जाच्या दारू देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे आश्वासन चर्चेत आले आहे.

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) प्रमुख विरोधी पक्ष आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या तेलुगु देसम पक्षाने हे आश्वासन दिले आहे. राज्यात सध्या लोकसभेबरोबच विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election) प्रचारही शिगेला पोहचला आहे. टीडीपीने सत्ताधारी वायएसआर काँग्रेसवर (YSR Congress) दारूच्या किंमती वाढविण्यात आल्याचा आरोप केला आहे.

राज्यात उपलब्ध दारूचा दर्जा चांगला नाही. राज्य सरकारकडून हलक्या प्रतीची दारू उपलब्ध करून दिली जात असून अधिकच्या किंमतीतून केवळ फायदा कमावला जात असल्याचा आरोप टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याकडून प्रचारसभांमध्ये केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री जगनमोहन ()Jagan Mohan Reddy यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये अबकारी शुल्कातून 17 हजार कोटी रुपये कमावले होते. 2022-23 मध्ये हा आकडा तब्बल 24 हजार कोटींवर पोहचला. राज्यात सरकारी मान्यताप्राप्त दुकानांमधून दारूची विक्री केली जाते.

नायडू (Chandrababu Naidu) यांनी रेड्डींवर निशाणा साधताना म्हटले की, 2019 च्या निवडणुकीत सत्तेत आल्यानंतर दारूवर बंधने आणण्याचे आश्वासन दिले होते. पण आता ते आपल्या वचनापासून मागे हटले आहेत. आता दारूसह सर्वच वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

मी जेव्हा दारूचा उल्लेख करतो तेव्हा माझे लहान भाऊ आनंदित होतात. दारूच्या किंमती कमी व्हाव्यात, असे त्यांना वाटते. जगनमोहन रेड्डी यांनी ही किंमत 60 रुपयांवर 200 रुपयांवर नेली. आता त्यातील शंभर रुपये ते आपल्या खिशात टाकत आहेत, असा आरोप नायडूंनी केला आहे.

एका प्रचारसभेत बोलताना नायडू यांनी सत्तेत आल्यानंतर 40 दिवसांत केवळ गुणवत्तापूर्ण दारू उपलब्ध करून दिली जाणार नाही तर त्याच्या किंमतीही कमी केल्या जातील, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी दारूवर बंधने आणायची का, असे प्रश्न लोकांना केला होता. पण नकारात्मक उत्तर आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT