Lok Sabha Election News : प्रशांत किशोर यांनी काँग्रेससह ‘इंडिया’चं वाढवलं टेन्शन

Prashant Kishor News : भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांना चांगली संधी होती. पण त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही संधी हातातून गेल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election News) भापजने 400 पारचे लक्ष्य ठेवले आहे. पण दक्षिण भारतात पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही, अशीही चर्चा आहे. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते दक्षिण भारताचे दौरे सातत्याने करत आहेत. त्यातच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या दाव्याने भाजपला दिलासा तर काँग्रेससह इंडिया आघाडीचे टेन्शन वाढवलं आहे.

मागील काही वर्षांत भाजपने (BJP) दक्षिण भारतावर विशेष लक्ष दिले आहे. पक्षाचा वेगाने विस्तार करण्याकडे, विविध निवडणुकांमध्ये (Election) मतांची टक्केवारी वाढविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी अनेकदा दौरेही केले आहेत. त्यातुलनेत काँग्रेस (Congress) किंवा इतर विरोधी पक्षांचे नेते फारसे दिसले नाहीत.

Prashant Kishor
Arvind Kejriwal News : मुख्यमंत्री केजरीवालांसाठी जगभरात आज सामुहिक उपवास; कुणी घेतला पुढाकार?

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी ‘पीटीआय’शी बोलताना म्हटले आहे की, सत्तारूढ भाजपला दक्षिण आणि पुर्व भारात जबरदस्त फायदा होणार आहे. या राज्यांतील मतदारसंघांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढणार आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतात भाजपला चांगले यश मिळू शकते.

भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांकडे खूप संधी होती. पण चुकीच्या निर्णयांमुळे ही संधी घालवली. तेलंगणामध्ये भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील. ही मोठी गोष्ट आहे. ओडिशामध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर राहील. बंगालमध्ये भाजपला चांगली संधी असून तृणमूल काँगेसपेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तमिळनाडूमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी दुहेरी अंकात जाईल, असे सांगताना प्रशांत किशोर म्हणाल्या, तेंलगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये एकूण 204 जागा आहेत. पण भाजपला 50 पेक्षा जास्त जागा अद्याप जिंकता आलेल्या नाहीत. 2-2019 च्या निवडणुकीत 47 जागा मिळाल्या होत्या. यावेळी हा आकडा पार केला जाऊ शकेल, असे भाकित त्यांनी वर्तवले आहे.

एकट्या भाजपला 370 जागा मिळणार नाहीत, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने निवडणुकीसाठी हे केवळ ध्येय निश्चित केले केल्याचे ते म्हणाले. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या झंझावातावर बोलताना त्यांनी यावेळी रेड्डींना फारसे यश मिळणार नाही, असे सांगितले.  

Prashant Kishor
Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींच्या पराभवासाठी भाजप नव्हे तर मित्रपक्षच उतावीळ; वायनाडमध्ये बसणार धक्का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com