Pashupati Paras, Chirag Paswan Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : पुतण्याला झुकते माप देताच काका भाजपवर खवळले; ‘एनडीए’ची डोकेदुखी वाढली

Rajanand More

Bihar News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा उद्या जाहीर होणार आहेत. त्याआधीच बिहारमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपने चिराग पासवान यांना पाच जागांची ऑफर दिल्यानंतर त्यांचे काका पशुपती पारस नाराज झाले आहेत. आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनीही पाच जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला असून, भाजपला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे बिहारमध्ये काका-पुतण्यातील वादाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.  

लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास पासवान) प्रमुख चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी नुकतीच भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी जागावाटप निश्चित झाल्याचे जाहीर केले. मात्र, प्रत्यक्ष जागा किती मिळणार, याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

भाजपने चिराग यांना पाच जागांची ऑफर दिल्याची चर्चा आहे, तर त्यांचे काका केंद्रीय मंत्री  लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पशुपती पारस (Pashupati Paras) यांच्या पक्षाला राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आली आहे, पण त्यावर पारस समाधानी नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पारस यांनी आज पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक घतेली. य बैठकीत पक्षाच्या विद्यमान पाच खासदारांचे मतदारसंघ आपल्यालाच मिळावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपकडून उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर होईपर्यंत आम्ही वाट पाहू, त्यामध्ये योग्य सन्मान न मिळाल्याचे दिसून आल्यास आमचा पक्ष स्वतंत्र असून, सर्व दरवाजे खुले आहेत, असा स्पष्ट इशारा पारस यांच्या पक्षाने दिला आहे.

एनडीएमध्ये (NDA) भाजपला 17, तर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दलाला (JDU) 16 जागा मिळाल्या आहेत. उरलेल्या सात जागांपैकी पाच जागा पासवान यांना मिळण्याची शक्यता आहे. पारस यांना एकही जागा मिळणार नाही. याविषयी बोलताना चिराग म्हणाले होते की, ते एनडीएमध्ये आहेत की नाही, हे मला माहिती नाही. बिहारमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT