Pawan Singh Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजपला मोठा धक्का; उमेदवारी जाहीर केलेल्या अभिनेत्याने नाकारले तिकीट

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर करून मोठी आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्याच दिवशी एका उमेदवाराने तिकीट नाकारल्याने पक्षावर नामुष्की ओढवली आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. मोदी लाटेत पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांची रीघ लागलेली असताना उमेदवारी जाहीर होऊनही ती नाकारल्याने चर्चांना उधाण आले आहे.

भाजपने (BJP) पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून भोजपुरी अभिनेते पवन सिंह (Pawan Singh) यांना उमेदवारी जाहीर केली होती. या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) सध्या खासदार आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी पवन सिंह यांना मैदानात उतरवण्यात आले होते. पण दुसऱ्याच दिवशी पवन सिंह यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

पवन सिंह यांनी एक्स हँडलवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून आसनसोल मतदारसंघातून मला उमेदवार घोषित केले. पण काही कारणास्तव मी आसनसोल मधून निवडणूक लढू शकणार नाही, असे पवन सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विनोद तावडेंकडून उमेदवारी जाहीर

देशभरातील 16 राज्यांतील 195 उमेदवारांची घोषणा भाजपकडून शनिवारी करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी वाचून दाखवली. त्यामध्ये पवन सिंह यांचेही नाव होते. पण चोवीस तासांच्या आत त्यांनी उमेदवारी नाकारली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या यादीत भाजपने(BJP) 34 केंद्रीय मंत्र्यांना, 28 महिलांना स्थान देण्यात आले आहे. तर 47 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यादीत 27 अनुसूचित जाती आणि 18 एसटी उमेदवार आणि 57 ओबीसी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 20, मध्य प्रदेशातील 24, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी 15, केरळमधील 12, तेलंगणातील 9, आसाममधील 11, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 11 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. दिल्लीतून 5, जम्मू-काश्मीरमधून 2, उत्तराखंडमधून 3, अरुणाचल प्रदेशमधून 2 आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार आणि दमण तसेच दीवमधून प्रत्येकी 1 एक उमेदवारांचा भाजपच्या पहिल्या यादीत समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT