Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी ! साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना धक्का; भाजपने लोकसभेचं तिकीट कापलं

BJP Candidates first List for Lok Sabha Election 2024 : भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं लोकसभेचं तिकीट कापल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला असून त्यांना वादग्रस्त वक्तव्य भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Sadhvi Pragya Singh Thakur
Sadhvi Pragya Singh ThakurSarkarnama
Published on
Updated on

BJP candidates first List News : लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने निवडणुकीसाठी कंबर कसली असून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच तब्बल 16 राज्यांतील 195 उमेदवारांची घोषणा केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर काही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळाली तर अनेकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे 'कही खुशी, कही गम' अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. (Marathi News)

भाजपने (BJP) विद्यमान खासदांचा पत्ता कट केलेल्यांमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळमधून खासदार होत्या. आता त्यांच्याऐवजी आता आलोक शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांना मोठा धक्का बसला असून त्यांना वादग्रस्त वक्तव्य भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sadhvi Pragya Singh Thakur
Kripashankar Singh News : भाजपच्या कृपेने आता कृपाशंकर सिंहांना उत्तर प्रदेशातून दिल्ली गाठावी लागणार!

कोणत्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला ?

केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. याबरोबरच केपी यादव यांच्या मतदारसंघातून आता ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांना संधी देण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांचं तिकीट कापलं आलं आहे. तसेच रमेश बिधुरी हे दक्षिण दिल्लीतून भाजपचे खासदार आहेत. मात्र, त्यांचाही पत्ता कट करत त्यांच्या जागेवर आता रामबीर सिंह बिधुरी यांना संधी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पर्श्वभूमीवरच भाजपने तब्बल 16 राज्यांतील 195 उमेदवारांची घोषणा केली. ही यादी जाहीर केल्यानंतर आता भाजप आपल्या उमेदवारांची दुसरी यादी देखील लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत कोणाला धक्का आणि कोणाला पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी मिळते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. (LokSabha Election 2024)

दरम्यान, रविवारी भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेल्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, स्मृती ईराणी, राजनाथ सिंह, हेमा मालिनी, शिवराज सिंह चौहान, मनोज तिवारी, रवी किशन, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह आदी दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मात्र, पहिल्या यादीत महाराष्ट्रातील कोणाचाही समावेश करण्यात आलेला नाही.

(Edited By-Ganesh Thombare)

Sadhvi Pragya Singh Thakur
Bharat Jodo Nyay Yatra : मोठी बातमी ! मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची तोफ धडाडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com