Lok Sabha Election 2024 : ज्योतिरादित्य शिंदेंची खेळी; पराभवाचा धक्का देणाऱ्या नेत्याचाच काटा काढला

Jyotiraditya Scindia News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत के. पी. यादव यांनी ज्योतिरादित्य शिंदेंचा धक्कादायक पराभव केला होता. त्यानंतर शिंदे यांनी काही महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश केला.
K P Yadav, Jyotiraditya Scindia
K P Yadav, Jyotiraditya ScindiaSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना गुना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ भाजप अन् शिंदे यांच्यासाठीही खास आहे. शिंदेंसोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडणाऱ्या एका कार्यकर्त्याला थेट त्यांच्याचविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवत भाजपने मोठी खेळी खेळली होती. शिंदेंना पराभवाचा धक्का बसला. पण आज त्याच नेत्याचा शिंदे यांनी काटा काढत या मतदारसंघातून उमेदवारी मिळवली आहे.

भाजपने (BJP) 2019 मध्ये के. पी. यादव यांना गुना मतदारसंघातून शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. यादव हे स्वत: शिंदे यांचे चाहते होते. काँग्रेसमध्ये (Congress) असताना त्यांच्यासाठी प्रचार करायचे. त्यांना भाजपने तिकीट दिल्यानंतर शिंदेंच्या पत्नी प्रियदर्शिनी यांनी खिल्ली उडवली होती. महाराजांसोबत सेल्फीसाठी लाईनमध्ये उभ्या राहणाऱ्यास भाजपने तिकीट दिले आहे, असे त्यांनी सोशल मीडियात म्हटले होते.

K P Yadav, Jyotiraditya Scindia
Kripashankar Singh News : भाजपच्या कृपेने आता कृपाशंकर सिंहांना उत्तर प्रदेशातून दिल्ली गाठावी लागणार!

प्रियदर्शिनी यांचे विधान मतदारांना रुचले नाही अन् शिंदेंचा पराभव झाला. गुना मतदारसंघ (Guna Constituency) शिंदे यांचा बालेकिल्ला. पण 2019 मध्ये यादव यांनी तब्बल 6 लाख 14 हजार मतं मिळवून त्यांना मोठा धक्का दिला. या पराभवानंतर शिंदेंनी (Jyotiraditya Scindia) वर्षभरातच भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेवर जात केंद्रीय मंत्रिपदही मिळवलं. त्यानंतर मात्रे यादव आणि शिंदे यांच्यातील दरी वाढतच गेली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यादव यांचा लेटरबॉम्ब

यादव यांनी 2022 मध्ये थेट पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांना पत्र लिहून शिंदेंची तक्रार केली होती. शिंदे समर्थक नेते, आमदार पक्षातील वातावरण खराब करत आहेत. आपल्यासोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप यादव यांनी केला होता. त्यानंतर पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर दोघांमध्य सातत्याने खटके उडत राहिले.

यादव यांचे तिकीट कापले

शिंदे यांचा पराभव करणाऱ्या यादव यांचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट कापण्यात आले आहे. शिंदे यांनी पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा आता रंगली आहे. कधीकाळी काँग्रेससाठी काम करणारे दोन्ही नेते आता भाजपमध्ये राहूनची एकमेकांचे राजकीय वैरी बनले आहेत. शिंदे यांनी गुनामधून उमेदवारी मिळवत पहिले यश मिळवले असले तरी आता निवडणुकीत काय होणार, हे लवकरच समजेल.

K P Yadav, Jyotiraditya Scindia
Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी ! साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना धक्का; भाजपने लोकसभेचं तिकीट कापलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com