Varun Gandhi Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजप वरुण गांधींना देणार धक्का? सरकारविरोधी वक्तव्य भोवणार...

Varun Gandhi : वरुण गांधी हे पिलिभित मतदारसंघाचे खासदार असून, त्यांनी अनेकदा केंद्र सरकारसह राज्य सरकारविरोधात वक्तव्यं केली आहेत.

Rajanand More

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, इच्छुकांची धाकधूकही वाढली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने आतापर्यंत २७ उमेदवारांची घोषणा करत मोठी आघाडी घेतली आहे, तर भाजपकडून पुढील काही दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जाऊ शकतात. यामध्ये भाजपकडून काही धक्के दिले जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.  (Lok Sabha Election 2024)

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सपा आणि काँग्रेसमधील जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. अखिलेश यादव यांनी काँग्रेसला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा काँग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात, तर दुसरीकडे भाजपनेही (BJP) काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. अखिलेश यांनी यापूर्वी भाजप एक जागा वगळता सर्वच जागांवरील उमेदवार बदलणार असल्याचे सूचक विधान केले होते.

पिलिभित लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांचा पत्ता कट होऊ शकतो. वरुण गांधी हे काँग्रेसचे नेते राहुल गांधींचे चुलत बंधू आहेत. 2019 च्या निवडणुकीत 11 लाख 87 हजार 225 मतांपैकी वरुण गांधींना 7 लाख 4 हजार 549 मते मिळाली होती. त्यांनी समाजवादी पक्षाचे हेमराज वर्मा यांचा पराभव केला होता. वरुण हे 2009 मध्येही या मतदारसंघातून निवडून आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी मात्र वरुण गांधी यांना तिकीट मिळणार नसल्याची जोरदार चर्चा आहे. वरुण हे स्पष्ट वक्ता म्हणून ओळखले जातात. अनेकदा त्यांनी पक्षविरोधी भूमिका उघडपणे घेतली आहे. राज्य तसेच केंद्र सरकारवर टीका करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. सरकारच्या योजना, शेतकरी आंदोलन, लखीमपूर खिरी प्रकरण, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरून त्यांनी निशाणा साधला होता. त्याचाच फटका त्यांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

वरुण यांच्या जागी भाजपकडून संज सिंह गंगवार यांना मैदानात उतरवले जाऊ शकते. ते विद्यमान आमदार आहेत. तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले जतीन प्रसाद यांच्याही नावाची चर्चा आहे. ते सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. यांसह भाजपकडून काही विद्यमान खासदारांनाही उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे.    

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT