New Delhi News : चंदीगड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. मतदानादरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेली आठ मतं वैध असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. तसेच ही मतं गृहीत धरून पुन्हा मतमोजणी करण्याचे आदेशही सरन्यायाधीशांनी दिले आहे. या आदेशामुळे भाजपला मोठा दणका बसला आहे. (Chandigarh Mayrol Polls)
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मंगळवारी मतदानादरम्यान निवडणूक अधिकारी अनिल मसीह यांनी मतपत्रिकांवर केलेल्या खुणांचा व्हिडिओ पाहिला. तसेच संबंधित आठ मतपत्रिका आज सादर कऱण्याचे आदेश कोर्टाने काल दिले होते. आज या मतपत्रिका पाहिल्यानंतर कोर्टाने मसीह यांना चांगलेच फैलावर घेतले. या मतपत्रिका पाहिल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी त्या वैध ठरवून मतमोजणी करण्याचे आदेश दिले.
आठ मतिपत्रिकांमध्ये आपचे (AAP) उमेदवार व याचिकाकर्ते कुलदीप कुमार यांना मतदान झाले होते. निवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोज सोनकर यांना 16 मते पडली होती, तर कुमार यांना केवळ 12 मते मिळाली होती. मसीह यांनी आपची आठ मते अवैध ठरवली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. कुमार यांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मसीह यांना मतपत्रिकांमध्ये खुणा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यावरून सुप्रीम कोर्टाने मसीह यांना चांगलेच झापले होते. कोर्टाने काल झालेल्या सुनावणीवेळीच पुन्हा मतदान न घेता आधीच झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज न्यायालयाने आदेश दिल्याने आप आणि काँग्रेस आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे.
कुलदीप कुमार होणार विजयी
निवडणुकीत आप व काँग्रेसच्या वीस नगरसेवकांनी मतदान केले होते. त्यापैकी आठ मते अवैध ठरवण्यात आली होती. आता ही मते वैध ठरणार असल्याने कुलदीप कुमार यांना वीस मते मिळणार आहेत, तर सोनकर यांना १६ मते असतील. त्यामुळे कुमार यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, या प्रकरणात भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. सोनकर यांनी रविवारी रात्रीच महापौर पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपचे तीन नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, पुन्हा मतदान होणार नसल्याने त्याचा काहीच परिणाम होणार नाही.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.