PM Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : मोदी करिष्मा दक्षिणेतही चालणार; सर्व्हेमध्ये भाजपला मोठा दिलासा

Rajanand More

New Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने 400 पेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी उत्तर भारतासह दक्षिण भारतातील जागाही भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. मागील काही महिन्यांत झालेल्या सर्व्हेमध्ये भाजप पिछाडीवर असल्याचे चित्र होते, पण ताज्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा दिसून आला आहे. त्यांच्या सभांमुळे अनेक राज्यांमध्ये भाजपला फायदा होताना दिसत आहे. तमिळनाडूसह केरळमध्ये भाजप खाते उघडताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) मागील काही महिन्यांत दक्षिण भारताचे अनेक दौरे केले आहेत. इंडिया आघाडीमुळे (India Alliance) उत्तर प्रदेशसह बिहार, दिल्ली आणि इतर काही राज्यांमध्ये भाजपला (BJP) काही प्रमाणात फटका बसू शकतो. त्याची भरपाई दक्षिण भारतातून करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. दक्षिण भारतात लोकसभेच्या 132 जागा आहेत.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेमध्ये भाजपला 132 पैकी किमान 35 जागा मिळू शकतात. भाजपने 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मिळालेल्या जागा कर्नाटक (Karnataka) आणि तेलंगणापुरत्याच मर्यादित होत्या. या वेळी इतर राज्यांमध्येही भाजपला जागा मिळू शकतात, असे या सर्व्हेतून समोर आले आहे.

तमिळनाडू, केरळमध्ये कमळ फुलणार

केरळमध्ये (Kerala) लोकसभेच्या तीन जागा भाजपला मिळू शकतात, असे सर्व्हमध्ये दिसते. तर सर्वाधिक सात जागा काँग्रेसला मिळतील. चार जागा सीपीएम, एक जागा सीपीआय आणि दोन जागांवर मुस्लिम लीगचा विजय होईल. तमिळनाडूमध्येही या वेळी भाजप खाते उघडण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला चार जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे, तर काँग्रेसला सहा आणि डीएमकेला 20 जागा मिळू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्नाटकमध्ये लॉटरी

कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असली तरी भाजपला लॉटरी लागू शकते. मागील निवडणुकीत भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. या वेळी तीन जागा कमी होणार असल्या तरी 22 जागांवर विजय मिळू शकतो, तर काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागेल. जेडीएसला दोन जागा मिळतील. त्यामुळे एनडीएचा आकडा राज्यात 24 वर जाऊ शकतो.

आंध्र प्रदेशात संधी नाही

आंध्र प्रदेशात भाजपचे या वेळीही खाते उघडणार नाही. राज्यातील 25 पैकी 15 जागा वायएसआर काँग्रेसला आणि दहा जागा टीडीपीला मिळू शकतात. काँग्रेस आणि भाजपला एकही जागा मिळताना दिसत नाही, तर तेलंगणामध्ये भाजपला पाच, काँग्रेसला नऊ आणि बीआरएसला केवळ दोन जागा मिळतील, असे सर्व्हेतून समोर आले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT