Brijendra Singh, Rahul Kaswan Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : दोन दिवसांत भाजपच्या दोन खासदारांचा राजीनामा; काँग्रेसला ‘अच्छे दिन’…

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर काँग्रेसला अनेक धक्के बसत असताना भाजपलाही झटके बसण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांत दोन खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही खासदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला काहीसा दिलासा मिळाला आहे. काल ब्रिजेंद्र सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर आज राहुल कस्वां यांनीही भाजपला धक्का दिला.

ब्रिजेंद्र सिंह (Brijendra Singh) हे हिसार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. काल त्यांनी खासदारकीसह भाजपच्या (BJP) प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत त्यांचे नाव नव्हते. तसेच त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे दुसरी यादी जाहीर होण्याआधीच त्यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला.

दुसरे खासदार राहुल कस्वां यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते राजस्थानमधील (Rajasthan) चुरू मतदारसंघाचे खासदार होते. आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदारकीसह पक्षाचाही राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी काही तासांतच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने कस्वां यांचे तिकीट कापले आहे. त्यानंतर त्यांनी पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल कस्वां हे लोकसभेच्या दोन टर्म खासदार होते. त्यांचे वडीलही भाजपचे तीनदा खासदार होते. राहुल कस्वां यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली आहे. कालच राजस्थानमधील सहा माजी खासदारांसह 32 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामध्ये लालचंद कटारिया या माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कट्टर समर्थकांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.   

दरम्यान, काँग्रेसने दोन दिवसांपूर्वीच 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपमधून दाखल झालेल्या दोन्ही खासदारांचा समावेश असू शकतो. ब्रिजेश सिंह यांना हिसारमधून तर राहुल कस्वां यांना चुरू मतदारंसघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT