Lok Sabha Election 2024 : राज्यघटना बदलण्यासाठी 400 खासदारांची गरज! या विधानामुळे खासदार हेगडेंचं तिकीट भाजप कापणार?

Anantkumar Hegde : अनंतकुमार हेगडे हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे वादात अडकले आहेत. त्यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभेचे तिकीट कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
PM Narendra Modi, Anantkumar Hegde
PM Narendra Modi, Anantkumar HegdeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांना वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर काही तासांतच भाजपचे कर्नाटकातील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यघटना बदलण्यासाठी पक्षाला 400 जागांची गरज असल्याचे हेगडे यांनी म्हटले आहे. त्यावरून मोठे राजकीय वादळ उठले असून, काँग्रेसनेही जोरदार पलटवार केला आहे. आता हे विधान हेगडे यांना राजकीयदृष्ट्या महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेगडे (Anantkumar Hegde) यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपला (BJP) अडचणीत आणले आहे. आताही पक्षाने हेगडे यांच्या विधानापासून फारकत घेत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच पक्षाने त्यांच्याकडून खुलासाही मागवला आहे.

PM Narendra Modi, Anantkumar Hegde
Electoral Bond Update : 26 दिवस काय केलं? SBI ला ‘सुप्रीम’ दणका; मुदतवाढीच्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल

चार टर्म खासदार असलेले हेगडे रविवारी म्हणाले होते की, आमच्याजवळ लोकसभेत दोन तृतियांश बहुमत आहे, पण राज्यसभेत (Rajya Sabha) बहुमत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 हून अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यसभेतही बहुमत मिळेल. राज्यघटनेत बदल करण्यासाठी आणि काँग्रेसने (Congress) केलेले बदल हटवण्यासाठी दोन तृतियांश बहुमत आवश्यक आहे. तसेच वीसहून अधिक राज्यांमध्येही सत्ता असायला हवी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हेगडे यांच्या विधानानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) निशाणा साधला. ते म्हणाले, हेगडे यांचे हे विधान म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संघ परिवाराच्या छुप्या उद्देशाची सार्वजनिक घोषणा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान (Indian Constitution) नष्ट करायचे, हे नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी अधिकारी आणि लोकशाहीविषयी घृणा आहे.

हेगडे यांचे तिकीट कापणार?

भाजपने जाहीर केलेल्या 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीतून वादग्रस्त वक्तव्य केलेल्या खासदारांना वगळण्यात आले आहे. त्यामध्ये खासदार रमेश बिधुरी, परवेश साहिब सिंह वर्मा आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा समावेश आहे. हेगडे यांनीही निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. हा मुद्दा निवडणुकीतील प्रचारातही गाजण्याची शक्यता आहे. आता हाच न्याय हेगडे यांना लावल्यास त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वाढली आहे.

R

PM Narendra Modi, Anantkumar Hegde
Supreme Court News : निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात; मोदी सरकारची कोंडी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com