kanhaiya kumar sarkarnama
देश

Kanhaiya Kumar News : काँग्रेसकडून कन्हैया कुमारला लोकसभेची उमेदवारी, 'या' बड्या नेत्याशी होणार लढत

Akshay Sabale

दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं आघाडी केली आहे. त्यानुसार काँग्रेसनं आपल्याकडील तीन जागांवर उमेदवार रविवारी ( 15 एप्रिल ) जाहीर केले आहेत. आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांची चिरफाड करणाऱ्या कन्हैया कुमारला ( kanhaiya kumar ) काँग्रेसनं ( Congress ) लोकसभेची उमेदवारी दिली आहे. दिल्लीतील उत्तर-पूर्वमधून मतदारसंघातून कन्हैया कुमारला काँग्रेसनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. विद्यमान खासदार मनोज तिवारी ( Manoj Tiwari ) यांच्याशी कन्हैयाची लढत होणार आहे.

काँग्रेसनं ( Congress ) रविवारी रात्री 10 उमेदवारांची यादी जाहीर केली. दिल्लीत तीन जागांवर पक्ष निवडणूक लढविणार असून तीन्ही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले. उत्तर-पूर्वमधून कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम उदित राज, चांदणी चौकातून जे. पी. अगरवाल यांना तिकीट देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंजाबमधील अमृतसरमधून गुरजितसिंग औजला, जालंधरमधून माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, फतेहगड साहिब मतदारसंघातून अमतसिंग, भटिंडामद्ये जीत मनोहरसिंग सिद्धू, संगसूर मतदारसंघात सुखपालसिंग खैरा, तसेच पतियाळा मतदारसंघात धर्मवीर गांधी यांना संधी देण्यात आली आहे.

याशिवाय उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मतदारसंघात पक्षाने उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना तिकीट दिलं आहे. दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. गतवेळी सर्व सातच्या सात जागा भाजपनं जिंकल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT