Jharkhand News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. अनेक नेते पक्ष सोडून जात असून, आता त्यात आणखी एका विद्यमान खासदाराची भर पडणार आहे. झारखंडमधील पक्षाच्या खासदार गीता कोडा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्या माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नी आहेत. (Lok Sabha Election 2024)
झारखंड मुक्ती मोर्चासोबत केलेल्या आघाडीमुळे गीता कोडा नाराज असल्याचे सांगितले जात आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. त्या झारखंडमधील सिंघभूम मतदारसंघाच्या खासदार आहेत.
गीता कोडा या पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना पक्षाकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आले होते. 2006 मध्ये पहिल्यांदाच गीता कोडा यांचे पती मधू कोडा हे झारखंडचे मुख्यमंत्री बनले होते. ते राज्याचे पहिले असे मुख्यमंत्री होते, जे अपक्ष होते. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांना तुरुंगातही जावे लागले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गीता कोडा या पहिल्यांदा 2009 मध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी जय भारत समानता पार्टीच्या माध्यमातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. गीता या 25 हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्या झारखंडच्या सर्वात कमी वयाच्या आमदार ठरल्या होत्या. त्यांचे वय केवळ 25 वर्षे होते. याचवर्षी मधू कोडा यांना तुरुंगात जावे लागले होते.
काँग्रेसच्या एकमेव खासदार
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) 14 पैकी 11 जागांवर विजय मिळाला होता, तर गीता कोडा यांच्या रूपाने काँग्रेसला केवळ एक जागेवर विजय मिळाला होता. झारखंड मुक्ती मोर्चालाही एकच जागा मिळाली होती. आता कोडाही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसचा आकडा शून्यावर जाणार आहे. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसू शकतो.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.