YS Sharmila Reddy News : शर्मिला रेड्डींसह पतीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

Cyber Police News : शर्मिला यांनी पोलिसांत याबाबत तक्रार केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Anil Kumar, YS Sharmila
Anil Kumar, YS SharmilaSarkarnama

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वाय. एस. शर्मिला रेड्डी आणि त्यांचे पती अनिल कुमार यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी दोघांनीही स्वतंत्रपणे पोलिसांत तक्रार केली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (YS Sharmila Reddy News)

हैद्राबाद सायबर गुन्हे पोलिसांनी (Police) शर्मिला यांच्या तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला आहे. शर्मिला यांनी केलेल्या तक्रारीनुसार, ‘यू-ट्यूब, फेसबुक आणि इतर सोशल मीडियात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्या आहेत.’ त्यानुसार आयटी कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anil Kumar, YS Sharmila
Jagan Mohan Vs YS Sharmila : बहिणीचा मुख्यमंत्र्यांना धक्का; जगनमोहन यांना सोडचिठ्ठी देत खासदार रिसेप्शनला...  

आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शर्मिला आणि त्यांच्या पतीने केली आहे. त्यांच्यावर कारवाई न केल्यास समाजातील प्रतिष्ठा मलीन होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शर्मिला यांनी काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून त्यांचे बंधू व मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (CM Jagan Mohan Reddy) यांच्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वायएसआर काँग्रेसमधील काही नेत्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

शर्मिला यांनी तेलंगणा निवडणुकीनंतर आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत जगनमोहन यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आले. तेव्हापासून भाऊ-बहिणीतील राजकीय वैर प्रकर्षाने समोर येऊ लागले आहे. शर्मिला यांनी आतापासून विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. काँगेसकडून त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जाणार असल्याचीही चर्चा आहे.  

R

Anil Kumar, YS Sharmila
Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या दोघांसह चार आमदार भाजपमध्ये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com