Lok Sabha Election 2024 Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : ‘या’ तारखेनंतरच येणार वेळापत्रक; उमेदवारांवर राहणार AI ची नजर

Election Commission of India News : निवडणूक आयोगाकडून सध्या देशभरातील राज्यांचा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. पुढील 20 ते 25 दिवस हे काम सुरू राहणार असल्याचे समजते.

Rajanand More

New Delhi News : राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली जात असून, आता प्रत्येकजण वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची वाट पाहत आहे. पण वेळापत्रकासाठी अजून 20 ते 25 दिवसांची वाट पाहावी लागणार असल्याचे दिसते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सध्या विविध राज्यांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. (Lok Sabha Election 2024)

निवडणूक आयोगाचे काम 13 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचदिवशी किंवा त्यानंतर काही दिवसांतच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी चिन्हे आहेत. 2019 मधील निवडणूक 11 एप्रिल ते 19 मेदरम्यान सात टप्प्यांमध्ये झाली होती, तर निवडणुकीची घोषणा 10 मार्चला करण्यात आली होती. (Election Commission of India News)

निवडणुकीचा (Election) आयोगाकडून तयारीचा आढावा घेतला जात असून, एआयचे राज्यांचे दौरे सध्या सुरू आहेत. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर असे नियोजन असून, हा आढावा 13 मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

लोकसभा निवडणुकीत आयोगाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या आधारे सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर करडी नजर ठेवण्याचे नियोजन आहे. सोशल मीडियातील चुकीची माहिती निश्चित करणे आणि ती हटवणे, यासाठी एआयचा वापर केला जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे.

निवडणुकीदरम्यान सोशल मीडियात प्रसारित होणारी खोटी आणि भडकावू माहिती हटवण्याचे काम वेगात करण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. एखाद्या पक्षाच्या उमेदवाराने आचारसंहितेचा सातत्याने भंग केला, तर आयोगाकडून तत्काळ कारवाई केली जाईल. त्यांचे सोशल मीडिया हँडल बंद केले जाईल किंवा ब्लॉक केले जाईल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT