West Bengal News : पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणावरून सर्व विरोधी पक्षांनी ममता सरकारला घेरले आहे. भाजपसह काँग्रेस व डाव्या पक्षांनीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संदेशखाली प्रकरणातील आरोपी तृणमूल पक्षाचे नेते असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न ममता करत असल्याचा आरोप होत आहे. (Sandeshkhali Case )
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) नेते, माजी खासदार मोहम्मद सलिम यांनी या प्रकरणातील टीएमसीचे नेते शाहजहान शेख फरार होण्यामागे ममतांचाच हात असल्याचा आरोप केला आहे. शेख हे राज्य सरकारचे पाहुणे बनून पोलिसांच्या सुरक्षेत असल्याचा दावाही त्यांनी केला. ते सरकारी गेस्ट हाऊसमध्ये आहेत. ममता (Mamata Banerjee) आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या केसमधील संबंधांचे पुरावे नष्ट करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांना सर्व पुरावे मिळाल्यानंतर ते शाहजहान शेख सापडल्याची घोषणा करतील. पोलिस (Police) त्यांचा एन्काउंटरही करू शकतात, असा खळबळजनक दावाही सलिम यांनी केला आहे. टीएमसी नेत्यांनी समजून घ्यावे की, कोणी कोणासाठी नसते. कारण ममता बॅनर्जी यांना केवळ आपल्या भाच्याची सुरक्षा करायची आहे, इतर कुणाची नाही, अशी टीका सलिम यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, शुक्रवारी तपास यंत्रणांनी शेख यांच्या कोलकाता येथील नातेवाइकांच्या घरी धाडी टाकल्या. त्याचप्रमाणे ईडीनेही शेख यांना समन्स पाठवले असून, 29 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यांच्यावर मनिलाॅण्ड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे.
काय आहे संदेशखाली प्रकरण?
संदेशखालीमधील अनेक महिलांनी तृणमूलचे स्थानिक नेते शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपणे आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. रात्रीच्या वेळी ते घरी मुलींना घेऊन जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांकडून तृणमूलच्या नेत्यांविरोधात आंदोलन केले जात असून, त्याला भाजपचीही साथ मिळत आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. मागील महिन्यात शेख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यावेळी स्थानिकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. तेव्हापासून शेख फरार आहेत.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.