Gujarat News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर भाजपला गुजरातमध्ये धक्का बसला आहे. लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. वडोदरा येथील उमेदवाराच्या विरोधात पक्षाच्या एका महिला नेत्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांना नुकतेच पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर आता सावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार केतन इनामदार यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजपच्या (BJP) महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्योती पंड्या (Jyoti Pandya) यांचे पक्षाने निलंबन केले आहे. वडोदराचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार डॉ. रंजन भट्ट यांना पंड्या यांनी उघडपणे विरोध केला आहे. त्या वडोदराच्या माजी महापौरही आहेत. तसेच मागील चाळीस वर्षांपासून पक्षात काम करत होत्या.
पंड्या यांच्या निलंबनानंतर सावली मतदारसंघाचे आमदार केतन इनामदार (MLA Ketan Inamdar) यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा मंजूर करावा, असा ईमेल विधानसभा (Assembly) अध्यक्षांना पाठवला आहे. अंतरआत्माचा आवाज ऐकून आपण राजीनामा देत असल्याचे इनामदार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पंड्यांचे निलंबन आणि इनामदार यांच्या राजीनाम्यामागे नेमके काय राजकारण (Political News) आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंड्यांची भाजपवर जहरी टीका
वडोदरातील भाजपच्या उमेदवाराला विरोध करत ज्योती पंड्यांनी भाजपवर निशाणा साधला. मीडियाशी बोलताना त्यांनी भाजपचा उल्लेख डायनासोर असा केला. भाजपची अवस्था एका मोठ्या डायनासोरसारखी झाली आहे. त्याला आपली शेपटी चिरडली जात असल्याचे समजत नाही. शेपटीला झालेल्या जखमांच्या वेदना मेंदूपर्यंत पोहाेचायला वेळ लागेल, असे पंड्या म्हणाल्या.
भाजपमध्ये नेते बोलायला घाबरत असल्याचे सांगत पंड्या म्हणाल्या, प्रत्येकाचा अपमान केला जात असल्याने नेते बोलायला घाबरतात. पक्षांतरामुळे पक्षाची विचारधाराच धोक्यात आली आहे. वडोदऱ्यात नेत्यांची कमतरता नाही. पक्षाला नवीन चेहऱ्यांची गरज आहे. तुम्ही त्याच लोकांना उमेदवारी देत राहिलात तर तरुण पिढीला आपण पक्षात काय करतोय हा प्रश्न पडेल, अशी नाराजीही पंड्या यांनी व्यक्त केली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.