Lok Sabha Election 2024 : कर्नाटकात भाजपला धक्का? माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर...

Sadanand Gowda News : सदानंद गौडा हे कर्नाटकातील भाजपचे दिग्गज नेते मानले जातात. त्यांना लोकसभेचे तिकीट न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.
Sadanand Gowda
Sadanand GowdaSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर होण्याआधीच भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. अनेकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यापैकी काही नेत्यांकडून बंडाचे संकेत देण्यात आले आहेत. कर्नाटक भाजपमधील दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांचीही नाराजी समोर आल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. पुढील एक-दोन दिवसांत ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.

सदानंद गौडा (Sadanand Gowda) हे बंगळुरू उत्तर मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांचे तिकीट भाजपने (BJP) कापले असून, त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे गौडा नाराज असल्याचे बोलले जात आहे. गौडा हे भाजपचे कर्नाटकातील (Karnataka) मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. ते माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत.

Sadanand Gowda
Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाकडून बंगालसह गुजरात, यूपी, बिहारला दणका

गौडा यांची नाराजी समोर आल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी रविवारी सायंकाळी त्यांची भेटही घेतली होती. मात्र, त्यांची नाराजी दूर झालेली नाही, अशी चर्चा आहे. पुढील चोवीस तासांत ते आपली भूमिका स्पष्ट करून काँग्रेसमध्ये (Congress) दाखल होऊ शकतात. काँग्रेसने त्यांना बंगळुरू उत्तरसह म्हैसूर लोकसभा मतदारसंघाचा पर्याय दिल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गौडा हे वोक्कालिगा समाजातील नेते आहेत. म्हैसूरमध्ये हा समाज मोठा असल्याने त्यांना या मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात. काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतर काही नेते त्यांच्या संपर्कात आहेत. या मतदारसंघात भाजपने वाय. सी. के. वाडियार यांना उमेदवारी दिली आहे.

काय म्हणाले गौडा?

तिकीट कापल्यानंतर मीडियाशी बोलताना गौडा यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते म्हणाले, आता बोलण्यासाठी काही शिल्लक राहिलेले नाही. भाजप कर्नाटकात एक वेगळा पक्ष आहे, असे आता बोलू शकत नाही. याचे मला वाईट वाटते. काही गोष्टी माहिती झाल्यानंतर स्वार्थी उद्देशाने कुणाचा तरी बळी देणे योग्य नाही, असेही गौडा म्हणाले.

R

Sadanand Gowda
CBI News : हाय प्रोफाइल लोकांना अटक होऊ शकते; ‘सीबीआय’चे कोर्टातच संकेत, नेत्यांना धडकी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com