Bihar Political News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सहा टप्पे पूर्ण झाले असून सातव्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षातील नेते व्यस्त आहेत. इंडिया आघाडीचे नेतेही या टप्प्यातील मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहे. सोमवारी बिहारमधील पालीगंजमध्ये इंडिया आघाडीची सभा झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi News), राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी सभेला हजेरी लावली. पण त्यापुर्वी सभेचे स्टेज दोनदा कोसळल्याचा प्रकार घडला.
पालीगंज येथील प्रचारसभेला राहुल गांधींसह (Rahul Gandhi) तेजस्वी यादव व इतर नेते सहभागी झाले. हे नेते स्टेजवर आल्यानंतर अचानक स्टेज कोसळला. यावेळी राहुल गांधी पुढे होते. तेजस्वी यादव (Tejashvi Yadav) यांच्या भगिनी मीसा भारती (Misa Bharti) यावेळी त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी राहुल यांचा हात पकडून सावरले. स्टेज कोसळूनही राहुल हे सभेला उपस्थित नागरिकांकडे हात दाखवत होते. (India Aliiance Election Campaign)
दुसऱ्यांदा स्टेज खचल्यानंतर राहुल यांचे सुरक्षारक्षक त्यांच्या जवळ आले. त्यानंतर राहुल यांनी त्यांना सगळे ठीक असल्याचे सांगत दूर जाण्यास सांगितले. तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांना इतर नेते सावरत होते. काही वेळाने स्टेज कोसळूनही ही सभा पार पडली. राहुल यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांची जोरदार भाषणे झाली. (Latest Political News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, सभेमध्ये बोलताना राहुल म्हणाले, इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर अग्निपथ योजना रद्द केली जाईल. तसेच गरीब महिलांच्या खात्यात दरमहा 8 हजार 500 रुपये जमा केले जातील. जुलै महिन्यापासूनच याची सुरूवात होईल. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती बदलेल, असे आश्वासह राहुल यांनी सभेत दिले. (Latest Marathi News)
दरम्यान, सातव्या टप्प्यातील मतदान एक जूनला होणार आहे. या टप्प्यात सात राज्य आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 57 जागा आहेत. त्यानंतर चार जूनला मतमोजणी होणार आहे. एनडीएसह इंडिया आघाडीकडूनही आपणच सत्तेत येणार असल्याचा दावा केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.