Congress News : पंतप्रधान मोदींच्या 'या' बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार जोरदार शक्तिप्रदर्शन!

Rahul Gandhi and Akhilesh Yadav : शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला त्या ठिकाणीच राहुल गांधी आणि अखिलेश यादव महासभा घेणार
Rahul Gandhi and Akhilesh Yadav
Rahul Gandhi and Akhilesh YadavSarkarnama

Varanasi Loksabaha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024मध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. याच टप्प्यात पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीतही मतदान होणार आहे. मतदानाआधी या मतदारसंघात काँग्रेसही आपले शक्तिप्रदर्शन करणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आपला सहकारी पक्ष समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत मंगळवार(28 मे) जनसभा करणार आहे.

याबाबत माहिती देताना, 'वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अजय रॉय म्हणाले, उद्या राहुल गांधींची(Rahul Gandhi) ऐतिहासिक परिवर्तन जनसभा होणार आहे. ज्यामध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव सायंकाळी 4 वाजेपासून मोहनसराय जिथे मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला, तिथे महासभा करतील. मला वाटतं की संपूर्ण देश, प्रदेश आणि विशेषकरून वाराणसीत सातव्या टप्प्यात परिवर्तनाची लाट येथूनच निर्माण होईल.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi and Akhilesh Yadav
Amit Shah Vs Sharad Pawar : 'शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं...'; अमित शाहांचा गंभीर आरोप !

याआधी राहुल गांधी आणि अखिलेश यादव(Akhilesh Yadav) प्रयागराजमध्ये एका रॅलीला संबोधित एका सभेला संबोधित करण्यासाठी पोहचले होते. जिथे या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला होता आणि बॅरिकेड्स तोडून मंचापर्यंत पोहचले होते. यामुळे पळापळही झाली होती.

यामुळे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना सभेला संबोधित न करताच तिथून निघावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर वाराणसीत दक्षता बाळगली जात आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी पावलं उचलली गेली.

Rahul Gandhi and Akhilesh Yadav
Amit Shah News : समान नागरी कायद्याबाबत अमित शाहांनी केलं मोठं विधान; म्हणाले, पुढील पाच वर्षांत...

राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त महासभा सायंकाळी 4 वाजता मोहन सरायमध्ये होतील. यास परिवर्तन रॅली नाव दिलं गेलं आहे. लोकसभा(Loksabha Election) निवडणुकीसाठी I.N.D.I.A आघाडी बनल्यानंतर उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना अनेक रॅलींमध्ये एकत्र पाहिलं गेलं. सर्वात आधी ते आग्रा येथे एकत्र दिसले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com