Gujarat High Court : आता गुजरात सरकारवर आमचा विश्वास नाही! कोर्टात ‘हाय’होल्टेज सुनावणी…

Rajkot Fire Incidence : राजकोट येथील एका गेमिंग झोनला लागलेल्या आगीत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची दखल गुजरात हायकोर्टाने घेतली असून त्यावर सोमवारी सुनावणी झाली.
Gujarat High Court
Gujarat High CourtSarkarnama

Gujarat Latest News : गुजरातमधील राजकोट शहरात दोन दिवसांपूर्वी एका गेमिंग झोनला लागलेल्या भीषण आगीत (Rajkot Fire) 28 जणांचा बळी गेला. त्यामध्ये नऊ मुलांचाही समावेश होता. ही आग इतकी भयानक होती की, अनेकांच्या जळून कोळसा झाला. या घटनेची गुजरात हायकोर्टाने (Gujarat High Court) दखल घेतली. या घटनेवरून सोमवारी कोर्टात हायहोल्टेज सुनावणी झाली. न्यायाधीशांच्या संतापाचे चांगलेच चटके गुजरात सरकारसह महापालिका प्रशासनालाही बसले.

कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान दोन गेमिंग झोन (Gaming Zone Fire) दोन वर्षांपासून आग प्रतिबंधक ना हरकत प्रमाणपत्रासह इतर परवानग्या नसताना सुरू असल्याचे समोर आले. त्यावरून कोर्टाने गुजरात सरकारलाही (Gujarat Government) धारेवर धरले. राजकोट महापालिकेनेच गेमिंग झोनने आपली परवानगी घेतली नसल्याचे कोर्टात कबुल केल्यानंतर कोर्ट भडकले. (Latest Marathi News)

Gujarat High Court
Arvind Kejriwal News : दिल्लीतील मतदान होताच केजरीवाल सुप्रीम कोर्टात; काय आहे कारण?

अडीच वर्षांपासून गेमिंग झोन सुरू आहे. तुम्ही आंधळे झाले आहात, असं गृहित धरायचं का. तुम्ही काय करत होता, असे ताशेरे कोर्टाने महापालिका (Rajkot Municipal Corporation) अधिकाऱ्यांवर ओढले. राज्य सरकारलाही कोर्टाने धारेवर धरले. तुम्ही झोपी गेला होता का? आता आम्ही स्थानिक यंत्रणा आणि राज्य सरकारवर विश्वास ठेऊ शकत नाही, असे कोर्ट म्हणाले. (Rajkot Fire Latest News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सरकारच्या वतीने मनिषा लव कुमार शहा यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी अहमदाबादमधील (Ahmedabad) दोन गेमिंग झोनलाही परवानगी दिली नसल्याचे सांगत राज्यातील अशा समस्यांसाठी विशेष पथक स्थापन केल्याची माहिती दिली. हे पथक ७२ तासांत अहवाल सादर करणार असल्याचेही तयांनी सांगितले.

कोर्टाने मागील काही दिवसांत घडलेल्या काही घटनांचा उल्लेख करताना म्हटले की, मागील चार वर्षांत आम्ही अनेक निर्णय दिले आणि सुचनाही केल्या आहेत. पण त्यानंतर राज्यात अशा सहा घटना घडल्याचे सांगत कोर्टाने नाराजी व्यक्त केली. सुरतमध्ये 2023 मध्ये एका केमिकल फॅक्टरीला आग लागून सात जणांचा मृत्यू झाला होता.

मागील वर्षी जुलै महिन्यात अहमदाबादमधील एका रुग्णालयाला आग लागली होती. तिथून तातडीने 125 रुग्णांना इतरत्र हलवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. मे महिन्यात एका फटाक्यांच्या दुकानाला मोठी आग लागली होती. मार्च महिन्यात सुरतमधील एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत नवजात बालकाचा मृत्यू झाला होता.

Gujarat High Court
Yogi Adityanath News : योगींनी ‘यमराज’लाही आणलं निवडणुकीच्या प्रचारात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com