PC George, Prakash Javadekar Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : जावडेकरांचा विरोधकांना पहिला धक्का; बड्या नेत्यासह पक्षच भाजपमध्ये आणला...

Rajanand More

Kerala : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचणी सुरू केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी अनेक नेत्यांनी कंबर कसली आहे. भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी केरळात विरोधकांना पहिला धक्का दिला आहे. केरळचे प्रभारीपद सोपवल्यानंतर जावेडकरांनी बड्या नेत्यासह त्यांच्या पक्षालाच भाजपमध्ये आणण्यात यश मिळवलं आहे. (LokSabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) पार्श्वभूमीवर केरळमध्ये भाजपने (BJP) हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. जावडेकरांवर दोन दिवसांपूर्वीच केरळची (Kerala) जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी केरळमधील सात टर्म आमदार राहिलेले नेते पी. सी. जॉर्ज (PC George) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच त्यांनी केरळ जनपक्ष (धर्मनिरपेक्ष) हा आपला पक्षही भाजपमध्ये विलीन केला.

जॉर्ज यांनी केरळमधील पुंजार विधानसभा मतदारसंघाचे तब्बल 33 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यांनी 2017 मध्ये स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. यापूर्वी ते केरळ काँग्रेस (Congress) (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी) आणि केरळ काँग्रेस (सेक्युलर) या पक्षांमध्ये होते.

केरळ विधानसभेत 2011 ते 2015 या कालावधीत जॉर्ज हे मुख्य प्रतोद होते. त्यावेळी यूडीएफचे सरकार होते. लोकसभेच्या तोंडावर जॉर्ज हे भाजपमध्ये आल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी बुधवारी दिल्लीतील भाजप कार्यालयात प्रभारी प्रकाश जावडेकर, केंद्रीयमंत्री, व्ही. मुरलीधरन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी पक्षाकडे बोट दाखवले. पक्षाने संधी दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचेही कौतुक केले. देशहिताला वाहून घेतलेले पंतप्रधान भारताने पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे त्यांनाच सहकार्य करण्याबाबतचे एकमत पक्षात होते, असेही जॉर्ज यांनी सांगितले.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT