PM Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 81 कोटी जनतेला होणार लाभ

Sachin Fulpagare

PM Modi Cabinet Meeting : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या 3 डिसेंबरला लागणार आहेत. तसेच पुढील वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने मोफत धान्य योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा लाभ देशातील 81 कोटी जनतेला होणार आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. मोफत धान्य योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ दिली गेली आहे. याचा लाभ 81 कोटी नागरिकांना होईल. यासाठी केंद्र सरकार 11.80 लाख कोटी खर्च करेल,' असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ( Assembly Elections 2023 )

केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 हजार महिला अल्पबचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 1,261 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री अनुराग ठाकूर पत्रकारांना म्हणाले. ( Rajasthan Election 2023 )

योजनेचा उद्देश हा 2024-25 ते 2025-26 दरम्यान शेतकऱ्यांच्या कृषी उद्देशासाठी भाडे तत्त्वावर सेवा देण्यासाठी निवड झालेल्या 15,000 अल्पबचत गटांना ड्रोन उपलब्ध करणे हा आहे. योजनेनुसार 15,000 महिला अल्पबचत गटांना स्थायी व्यवसाय किंवा उपजीविकेसाठी मदत उपलब्ध करून दिली जाईल. याद्वारे दरवर्षी कमीत कमी १ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न ते मिळवू शकतील, असे ते म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तराखंडच्या सिलक्यारा येथील बचाव मोहिमेचा मुद्दाही चर्चेत आला. या चर्चेवेळी पंतप्रधान मोदी हे भावूक झाले होते. संपूर्ण सरकार बचाव मोहिमेच्या कामात होते. सर्व कामगारांचे प्राण वाचवण्यात सर्व प्रयत्न केले गेले, असे मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT