Uttarakhand Tunnel Rescue : बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची 17व्या दिवशी सुखरूप सुटका, बचावकार्य यशस्वी

Uttarkashi Tunnel Rescue Update : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या उत्तरखंडमधील बोगद्यातून सर्व 41 कामगारांना वाचवण्यात यश आले आहे...
Uttarakhand Tunnel Rescue Operation
Uttarakhand Tunnel Rescue OperationSarkarnama
Published on
Updated on

Uttarakhand Tunnel Latest News : उत्तरकाशीतील सिल्क्यारामधील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना अखेर 17 व्या दिवशी बाहेर काढण्यात आले आहे. बोगद्यातून बाहेर येताच कामगारांना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. बचावकार्य यशस्वी झाल्याने मजुरांचे कुटुंबीय, बचाव पथक आणि प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

Uttarakhand Tunnel Rescue Operation
Sessions of Parliament : पाच राज्यांतील निवडणूक निकालाचा संसद अधिवेशनावर जाणवणार परिणाम; विरोधकांची घेरण्याची तयारी

झारखंडमधील कामगार विजय होरो यांना सर्वात पहिले बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गणपती होरो यांना बाहेर काढले गेले. यावेळी त्यांना शॉल पांघरत मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. यानंतर मनजीत, अनिल, धीरेंद्र नायक, उनाधर नायक, तपन मंडल, राम प्रसाद, चंपा उराव, जय प्रकाश, सुखराम यांना बाहेर काढले गेले. रंजीत लोहार, महादेव नायक, जयदेव वैरा, सोखिम मन्ना, संजय, राजेंद्र, रामसुंदर, सुबोध कुमार वर्मा, विश्वजीत वर्मा, समीर नायक, रविंद्र नायक, राम मिलन, संतोष कुमार, अंकित कुमार, सतदेव, सोनू शाह, दीपक कुमार, मानिक, अखिलेश, गब्बर सिंह नेगी, अहमद, सुशील शर्मा, विरेंद्र, भगतू, रिंकू या कामगारांनाही बोगद्यातून बाहेर काढण्यात आले. ( Assembly Elections 2023 )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बोगद्यात ढासळलेल्या ढिगारा भेदून ड्रिलिंग मशिनने छोटा बोगदा करून सर्व मजुरांना सुरक्षित बाहेर काढले गेले. यासाठी 800 एमएम पाईप टाकण्यात आले. या पाईपांमधून एक-एक करून सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढले गेले. जे मजूर येऊ शकत नव्हते त्यांना चाके असलेल्या स्ट्रेचरला दोरखंड बांधून बाहेर काढण्यात आले. ( Rajasthan Election 2023)

बोगद्यातून बाहेर काढण्यापूर्वीच प्रशासनाने सर्व कामगारांसाठी संपू्ण यंत्रणा सज्ज ठेवली होती. 41 रुग्णवाहिका बोगद्याजवळ उभ्या होत्या. यासोबत डॉक्टरांचे पथकही तैनात होते. बोगद्यातून बाहेर निघालेल्या कामगारांना प्राथमिक तपासणीसाठी तिथेच जवळ उभारण्यात आलेल्या अस्थायी उपचार केंद्रात नेण्यात आले. गरज पडल्यास कामगारांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तिथे हेकॉप्टरही तैनात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख नेत्यांनी बचावकार्य करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले आहे. माणुसकी आणि एकजुटीचे हे एक उदाहरण असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

चिन्यालीसौडमध्ये हॉस्पिटल सज्ज

चिन्यालीसौड येथे 41 खाटांचे एक हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढलेल्या कामगारांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. या बचाव मोहीमेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी स्वतः या बचावकार्यावर लक्ष ठेवून होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामीही अपडेट घेत होते. 12 नोव्हेंबरला तारखेला बोगद्यात ढिगारा कोसळून 41 कामगार अडकले होते.

Uttarakhand Tunnel Rescue Operation
BJP News : भाजपचा लोकसभा निवडणुकीचा अजेंडा जाहीर? सोशल मीडिया अकाउंटवरून दिला सूचक संदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com